तर पुढील वर्षी परवाना रद्द
नागपूर (Ganesh POP idol) : न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेश मंडळांकडून पीओपी मूर्ती स्थापन करणार नाही याबाबत शपथपत्र लिहून घेण्यात येत असून सोबतच उपद्रव शोधपथकाद्वारा विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई सुरू आहे. त्यांच्याकडून (Ganesh POP idol) पीओपी मूर्ती जप्त करण्यात येत आहे. दुसर्यांदा पथकाला पीओपी मिळाल्यास पुढील वर्षात विक्रेत्यांचा परवानाच रद्द करण्यात येईल, असा इशाराच महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी अदला आहे.
सोबतच नागरिकांना नेताजी मार्वेâट आणि रामनगरात मातीच्या (Ganesh POP idol) मूर्ती विक्री केंद्रांची व्यवस्था करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक मातीची मूर्ती बनविण्याचे प्रशिक्षण देऊन समाजात जागृती करण्यात येत असल्याचे डॉ. चौधरी यांनी स्पष्ट केले. ते सोमवारी महापालिका मुख्यालयात अनौपचारिक चर्चेत पत्रकारांशी बोलत होते.