उदगीर (Udgir Airport) : उदगीर शहर आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सिमेवर आहे. उदगीरला ऐतिहासिक वारसा असून मोठी बाजारपेठ आहे. तसेच जिल्हास्तरीय सर्व कार्यालये, जिल्हास्तरीय न्यायालये, प्रादेशिक परिवहन (आर.टी.ओ.) कार्यालयासह वेगवेगळ्या प्रकारची जिल्हास्तरीय कार्यालये आहेत. तसेच रेल्वेची कनेक्टीव्हीटी असल्याने दळणवळणासाठी लागणाऱ्या सर्व यंत्रणा उदगीर शहरात उपलब्ध होत आहेत.
तसेच नियोजित विमानतळासाठी मुबलक प्रमाणात जागाही उदगीर येथे उपलब्ध असून (Udgir Airport) उदगीर येथे विमानतळास मंजुरी द्यावी, अशी मागणी एअरपोर्ट ऑथाॅरिटी ऑफ इंडियाकडे करण्यात आली आहे.
एअरपोर्ट ऑथाॅरिटी ऑफ इंडिया यांनी याबाबत सकारात्मक विचार केला असून, (Udgir Airport) उदगीर येथे विमानतळ उभे करण्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरु करणार असल्याचे एअरपोर्ट ऑथाॅरिटी ऑफ इंडियाचे सदस्य अनिल गुप्ता यांनी कळवले आहे. उदगीरकरांचे स्वप्न साकार होणार आहे. सदर (Udgir Airport) विमानतळ उदगीरला झाले तर आंध्रप्रदेश, तेलंगणा व कर्नाटक राज्यातील व्यापा-यांना याचा फायदा होणार असून या भागातील नागरिकांना देश – विदेश व धार्मिक स्थळांना जाण्यासाठी याचा उपयोग होणार आहे.