छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी घटना; समर्थकांना भेटण्यासाठी खाली आल्यानंतर अचानक उलटी
छत्रपती संभाजीनगर : कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांची शनिवारी अचानक प्रकृती बिघडल्याची घटना समोर आली आहे. समर्थकांशी संवाद साधत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यानंतर त्यांना उलटी झाली.
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra: Abhijit Deepke, founder president of the Cockroach Janata Party, fell ill suddenly. Doctors have reached his residence and are examining his health condition. The reason behind his deteriorating health is not yet known. Further details will… pic.twitter.com/Cu6oVuYQ3w
— IANS (@ians_india) August 1, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११:४५ वाजता अभिजीत दीपके हे छत्रपती संभाजीनगर येथील आपल्या निवासस्थानाच्या पार्किंगमध्ये जमलेल्या समर्थकांना भेटण्यासाठी खाली आले होते. यावेळी ते उपस्थितांशी संवाद साधत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली.
यानंतर दीपके हे घराच्या मागील बाजूस गेले. तेथे त्यांना उलटी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे त्यांच्या समर्थकांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले.