Balaji Urban Credit Society

बालाजी अर्बन परिवारातर्फे अंकुशराव पाटील पडघान व ॲड. विजय कोठारी यांचा यथोचित सत्कार

Balaji Urban Credit Society: जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये अग्रेसर असलेल्या बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., चिखलीच्या बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड

बालाजी अर्बन परिवारातर्फे अंकुशराव पाटील पडघान व ॲड. विजय कोठारी यांचा यथोचित सत्कार

Balaji Urban Credit Society

बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी अंकुशराव पाटील यांची बिनविरोध निवड; अंबिका अर्बनच्या अध्यक्षपदी ॲड. विजय कोठारी

चिखली : जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमीच अग्रेसर असलेल्या बालाजी अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., चिखलीच्या वतीने बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मा. अंकुशराव पाटील पडघान तसेच अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मा. ॲड. विजय कोठारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे संचालक प्रताप मधुकर खरात यांचाही वाढदिवसानिमित्त परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.

बालाजी अर्बनच्या स्वा. विनायक दामोधर सावरकर सभागृहात दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी हा कार्यक्रम पार पडला. चिखली विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार विकासकन्या सौ. श्वेताताई महाले यांचे वडील मा. अंकुशराव पाटील पडघान यांची बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच चिखली शहरातील नामांकित अंबिका अर्बन मल्टीस्टेट को-ऑप. सोसायटीच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत मा. ॲड. विजय कोठारी यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बालाजी अर्बनचे अध्यक्ष  नारायणराव गणपत खरात होते. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सत्यनारायण बजरंग लढढा, कार्यकारी संचालक गोपाल गोविंदराव शेटे, माजी अध्यक्ष ॲड. मंगेश हरीभाऊ व्यवहारे, संचालक नारायण देविदास भवर तसेच जुलालसिंग विठोबा परिहार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे कार्यकारी संचालक गोपाल गोविंदराव शेटे यांनी केले. त्यांनी उपस्थित मान्यवरांना बालाजी अर्बन परिवाराच्या वतीने सदिच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना ॲड. विजय कोठारी यांनी सहकार क्षेत्रातील निवडणुकांमध्ये उद्भवू शकणारे संभाव्य धोके तसेच त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर सत्कारमूर्ती मा. अंकुशराव पडघाण पाटील यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा सहकारी बँकेत काही काळ सेवा बजावल्यानंतर त्याच बँकेच्या संचालकपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. तसेच आपल्या सत्काराबद्दल बालाजी अर्बन परिवाराचे आभार मानले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष सत्यनारायण बजरंग लढढा यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेचे सरव्यवस्थापक अनिल गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सहायक व्यवस्थापक  अशोक नाईक, वरिष्ठ अधिकारी रमेश देशमुख आणि शाखाधिकारी  अतुल भोकरदणकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

संबंधित सामग्री

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

सेवा संकल्प अभियानातून स्वच्छ चिखलीचा संदेश; माजी सैनिकांचा सन्मान

Chikhli Seva Sankalp Mission: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच त्यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवापर्वानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान

Oct 02, 2026
मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

मुख्यमंत्री सहायता निधीत एक लाखांची मदत; वाढदिवसानिमित्त मुख्याधिकाऱ्यांची सामाजिक बांधिलकी

Chief Officer Prashant Bidkar: चिखली नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत बिडकर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जपत मुख्यमंत्री सहायता निधीत १ लाख रुपयांची मदत जमा केली.

Oct 01, 2026
पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे धडक पाठपुरावा

Chikhli Farmers' Crop Loan: खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर कराव्यात, या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा

Sep 30, 2026