राष्ट्रीय महामार्ग अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 361 वरील भाटेगाव कालव्यावरील अपघाताची मालिका अखंड सुरूच आहे. पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन सायंकाळी पलटी झाले

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-361 वरील अपघात मालिका सुरूच!

National Highway Accident

 

भाटेगाव कालव्यावरील वळण बनले मृत्यूचा सापळा 
29 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5:30 वाजता पपई घेऊन जाणारे बोलेरो वाहन पलटी झाले 

डोंगरकडा (National Highway Accident) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- 361 वरील भाटेगाव कालव्यावरील अपघाताची मालिका अखंड सुरूच आहे. आज 29 ऑगस्ट रोजी पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन सायंकाळी ठीक 5:30 वाजता पलटी झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - 361 हा वारंगा फाटा येथून सुरू होतो . ह्या मार्गावरील अनेक जुने पूल जशास तसे ठेऊन त्याच पुलाला डागडुजी करून कामे केली आहेत आणि जेथे धोक्याची वळणं आहेत ती तशीच ठेऊन टोलनाका मोठ्या थाटात अर्धवट कामे ठेऊन सुरू केला आहे.

भाटेगाव कालव्यावरील अपघातात अनेकांचे प्राण गेले आहेत कित्येकजण जायबंदी झाले आहेत तर शेकडो अपघाताची नोंदच केलेली नाही कारण अपघात झाला की आपसात मिटवून प्रकरण मिटवले आहेत.

दिनांक 27आणि 28 ऑगस्ट ला गोबी वाहतुक करणारे आयशर आणि ट्रक पलटी झाले आणि आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी पपई वाहतूक करणारे बुलेरो वाहन पलटी झाले यात ड्रॉइव्हर ला किरकोळ दुखापत झाली आहे. वाहन पलटी झाल्याने पुन्हा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या या घटनेची माहिती मिळताच डोंगरकडा पोलीस चोकीचे जमादार संतोष नागरगोजे आणि विठ्ठल जाधव यांनी घटनास्थळी जाऊन वाहतुक सुरळीत केली.

या अपघात स्थळाची हिंगोली जिल्हाधिकारी यांनी स्वतः पाहणी करून येथील धोक्याचे वळण काढून घेण्यासाठी सदरील कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी जनतेतून होत आहे.

संबंधित सामग्री

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक- ३६१वरील भाटेगाव कालव्यावरील वळणावर पुन्हा अपघात

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील अपघाताची मालिका सुरूच असताना जिल्हा प्रशासकीय यंत्रणा अद्यापही कुंभकर्णी झोपेमध्येच दिसून येत आहे.

Aug 31, 2026
परभणीत धडकेनंतर सिमेंटचा ट्रक- टिप्पर जळून खाक

परभणीत धडकेनंतर सिमेंटचा ट्रक- टिप्पर जळून खाक

Parbhani Truck-Tipper Fire: सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्परमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी

Aug 26, 2026
तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

तीन वाहनांचा विचित्र अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर चोरंबा फाट्याजवळील पेट्रोल पंप परिसरात रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला.

Aug 24, 2026
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

National Highway Accident: राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वर  अज्ञात वाहनाने पायदळ चालणार्‍या इसमास जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. 

Aug 23, 2026
नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

नांदेड-वारंगा फाटा राष्ट्रीय महामार्गावर कारच्या धडकेत  दुचाकी स्वाराचा मृत्यू

National Highway Accident: रंगा फाटा–नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील नांदेड–हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या हिवरा फाटा येथे भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडकेत मृत्यू झाला.

Aug 17, 2026