परभणी ट्रक- टिप्पर आग

परभणीत धडकेनंतर सिमेंटचा ट्रक- टिप्पर जळून खाक

Parbhani Truck-Tipper Fire: सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्परमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी

परभणीत धडकेनंतर सिमेंटचा ट्रक- टिप्पर जळून खाक

Parbhani Truck-Tipper Fire

 

वसमत रोडवरील त्रिधारा पाटीजवळील घटना; दोन्ही वाहन चालक जखमी

परभणी (Parbhani Truck-Tipper Fire) : सिमेंटने भरलेला ट्रक आणि टिप्परमध्ये जोरदार धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत दोन्ही वाहने जळून खाक झाली. या अपघातात सुदैवाने जीवितहानी झाली नसून दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले आहेत. ही घटना बुधवार २६ ऑगस्ट रोजी पहाटे पाचच्या सुमारास वसमत रोडवरील त्रिधारा पाटी पुलाजवळ घडली. 

या (Parbhani Truck-Tipper Fire) घटनेविषयी अधिक माहिती अशी की, एम.एच. ३४ बी.झेड. १८९७ या क्रमांकाचा ट्रक सिमेंट घेऊन परभणीकडे येत होता. तर एमएच ४३ यु.  ७६०८ या क्रमांकाचा टिप्पर राहटीकडे जात असताना त्रिधारा पाटीजवळील पुलावर दोन्ही वाहनांचा अपघात झाला. अपघातानंतर वाहनांनी पेट घेतला. पहाटेच्या वेळी त्रिधाराकडे दर्शनासाठी जाणार्‍या नागरीकांनी दोन्ही वाहनातील चालकांना वेळीच बाहेर काढले. घटनेची माहिती परभणी अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन अधिकारी दिपक कानोडे, फायरमन निखिल बेंडसुरे, मदन जाधव, वाहन चालक वसीम अखिल अहेमद यांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. या अपघातात दोन्ही वाहनांचे चालक रमेश कांबळे, किशोर जाधव जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी परभणी येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

ओव्हरटेकच्या नादात टिप्परची कारला धडक; मोठी दुर्घटना टळली

Risod-Lonar Road Car accident: रिसोड–लोणार मार्गावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते बाराच्या सुमारास ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भरधाव टिप्परने कारला धडक दिल्याची घटना मांगवाडी फाट्याजवळ

Sep 24, 2026
सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; कार कंटेनरखाली अडकली, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंबजवळ कार-कंटेनर अपघातात कर्ण पवार यांचा मृत्यू; अनिकेत धोत्रे आणि रोहित मोरे गंभीर जखमी.

Sep 22, 2026
प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा ईस्टर्न फ्री वेवर अपघात; ३ वाहनांना धडक

ईस्टर्न फ्री वेवर प्रवीण दरेकरांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; टॅक्सी आणि दोन कारला धडक. आमदार दरेकर सुरक्षित, पोलिसांचा तपास सुरू.

Sep 21, 2026
मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

मुंबईत आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक; विलेपार्ल्यात अपघात

विलेपार्ल्यात आमदार सुनील प्रभू यांच्या कारची पादचाऱ्याला धडक. सुनील धुलविया जखमी असून चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Sep 18, 2026
यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

यवतमाळमध्ये कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू; घाटंजी तालुक्यात हळहळ

घाटंजीतील चिखलवर्धा येथे कारमध्ये अडकलेल्या चार वर्षीय अंशचा उपचारादरम्यान मृत्यू. ऑक्सिजन व रुग्णवाहिका उपलब्धतेबाबत नातेवाइकांचे गंभीर आरोप.

Sep 18, 2026