BMW Crash

बदलापुरात भरधाव BMW चा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कारचा वेग २५१ किमी/तास असल्याचा दावा

बदलापुरातील मुंबई-बडोदा महामार्गावर रविवारी (२१ जून) पहाटे झालेल्या भीषण अपघातात भरधाव BMW कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.

बदलापुरात भरधाव BMW चा भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, कारचा वेग २५१ किमी/तास असल्याचा दावा

BMW Crash

मुंबई-बडोदा महामार्गावर पहाटेची दुर्घटना; डिव्हायडरला धडकल्यानंतर कार अनेकदा पलटल्याची माहिती

बदलापूर (BMW Crash) : बदलापुरातील मुंबई-बडोदा महामार्गावर रविवारी (२१ जून) पहाटे झालेल्या भीषण अपघातात भरधाव BMW कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, या दुर्घटनेत दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर समोर आलेल्या काही व्हिडिओंमध्ये कारचा वेग तब्बल २५१ किमी/तास असल्याचा दावा केला जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित BMW कार टिटवाळ्यावरून बदलापूरच्या दिशेने येत होती. वाढदिवसाची पार्टी आटोपून परतत असताना हा भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. भरधाव वेगामुळे एरंजाड परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार थेट रस्त्यावरील डिव्हायडरवर आदळली.

धडक इतकी जोरदार होती की, कार अनेक वेळा पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की BMW कारचा पूर्णपणे चुराडा झाला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातात कारमधील एका तरुणीच्या मृतदेहाचे अवयव सुमारे ५०० मीटर अंतरापर्यंत विखुरल्याचे सांगितले जात आहे. या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेली दोन्ही व्यक्ती बदलापूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दरम्यान, अपघातानंतरचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यामध्ये वाहनाचा वेग २५१ किमी/तास पर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात येत आहे. या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण आणि संपूर्ण घटनाक्रमाचा पुढील तपास सुरू आहे.

योगेश दिघे आणि रिकेबा जॅकप या दोघांचा जागीच मृत्यू झाले. आनंद नावाचा एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर ठाण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. शनिवारी वाढदिवसाची पार्टी करून हे सर्व बदलापूरला परत येत असताना ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी दाखल झालीय. पुढील तपास पोलीस करत आहेत. काहींच्या मते चालक मद्याच्या अमलाखाली होता. अद्याप पोलिसांकडून याबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. 

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026