Bus Stand Death

पोटा बुद्रुक येथील युवकाचा औंढा नागनाथ बस स्थानकात आढळला मृतदेह

पोटा बुद्रुक येथील युवक गोविंद राधोजी पिंपरकर (२६) यांचा २७ ऑगस्ट रोजी सकाळी औंढा नागनाथ येथील बस स्थानकात मृतदेह आढळून आला.

पोटा बुद्रुक येथील युवकाचा औंढा नागनाथ बस स्थानकात आढळला मृतदेह

Bus Stand Death

औंढा नागनाथ : तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील युवक गोविंद राधोजी पिंपरकर (२६) यांचा २७ ऑगस्ट रोजी सकाळी औंढा नागनाथ येथील बस स्थानकात मृतदेह आढळून आला. मृत्यूचे कारण स्पष्ट नसले तरी दारूच्या नशेत मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच औंढा नागनाथ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक शामकुमार डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार बबन चव्हाण, शाहेद सय्यद, जयदीप जाधव आणि ओंकारेश्वर रांजणेकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औंढा नागनाथ ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

मयत गोविंद पिंपरकर यांना दारूचे व्यसन होते. ते औंढा नागनाथ येथे आले होते. दारूच्या नशेत ते बस स्थानकात थांबले होते. दरम्यान, रात्रीच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला असावा. सदरील घटना सकाळी उघडकीस आली. दारूच्या नशेतच मयत गोविंद यांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

मयत गोविंद पिंपरकर यांचे लग्न झाले नव्हते. त्यांच्या वडिलांचाही यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात आई आणि भाऊ असा परिवार आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास जमादार बबन चव्हाण करत आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026
 प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय; मारेकऱ्यांपैकी एकाला गोळी लागली का? ठाणे पोलिसांकडून तपास

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात नवा संशय समोर आला आहे. गोळीबारात मारेकऱ्यांपैकी एक जखमी झाला का, याचा ठाणे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026