गो-सन्मान दिवस

चिखलीत २७ एप्रिल रोजी ‘गो-सन्मान दिवस’ उत्साहात साजरा होणार

Cow Honor Day: चिखलीत २७ एप्रिल रोजी ‘गो-सन्मान दिवस’ निमित्त विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन होणार.

चिखलीत २७ एप्रिल रोजी ‘गो-सन्मान दिवस’ उत्साहात साजरा होणार

Cow Honor Day

चिखली (Cow Honor Day) : देशातील सर्व साधू-संतांच्या आवाहनानुसार यंदापासून २७ एप्रिल हा दिवस ‘गो-सन्मान दिवस’ म्हणून साजरा केला जाणार असून, त्यानिमित्त चिखली नगर व तालुक्यात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने दि. २६ एप्रिल रोजी रविवारी सायंकाळी ७ वाजता मौनी बाबा संस्थान येथे राजस्थान येथील संत प.पू. बालकृष्णजी महाराज यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. तसेच दि. २७ एप्रिल रोजी सोमवारी सकाळी ९ वाजता वाराणसीचे प.पू. विवेकदास शास्त्री महाराज यांची ‘गो-कथा’ होणार आहे.

कथा संपल्यानंतर उपस्थितांना प्रसाद वितरण करण्यात येणार असून, त्यानंतर तहसील कार्यालयाकडे निवेदन देण्यासाठी रॅली काढण्यात येणार आहे. (Cow Honor Day) गोमातेला ‘राष्ट्रमाता’ घोषित करणे, गोहत्या व गो-धन तस्करी बंद करणे या मागण्यांसाठी स्वाक्षरीयुक्त निवेदन सादर करण्यात येणार आहे. हे निवेदन मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान, मा. राज्यपाल व मा. मुख्यमंत्री यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

या कार्यक्रमासाठी तहसीलदार यांची वेळ घेण्यात आली असून, विशाल नंदीबाबांच्या नेतृत्वात ही रॅली पार पडणार आहे. या भव्य सोहळ्यात नागरिक, माता-भगिनी, विद्यार्थी व युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन चिखली तालुका संघचालक शरद भाला यांनी केले आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026