दामिनी अॅप डाउनलोड करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले ‘दामिनी (Damini Lightning Alert)’ हे मोबाईल अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन चिखली तहसील प्रशासनाने केले आहे.

दामिनी अॅप डाउनलोड करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन

वीज पडण्याच्या घटनांपासून सावध राहा; १५ मिनिटे आधी मिळणार धोक्याचा इशारा

चिखली (Damini App) : मान्सून काळात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने विकसित केलेले ‘दामिनी (Damini Lightning Alert)’ हे मोबाईल अॅप डाउनलोड करण्याचे आवाहन चिखली तहसील प्रशासनाने केले आहे.

तहसील कार्यालय, चिखली यांच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दरवर्षी वीज पडण्याच्या घटनांमुळे मनुष्यहानीसह पशुधन आणि मालमत्तेचेही मोठे नुकसान होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी जिल्ह्यातील नागरिकांनी दामिनी अॅपचा अधिकाधिक वापर करून आपली सुरक्षितता सुनिश्चित करावी, असे आवाहन केले आहे.

हे अॅप गुगल प्ले स्टोअरवर ‘Damini Lightning Alert’ या नावाने उपलब्ध आहे. अॅप डाउनलोड केल्यानंतर मोबाईलचे लोकेशन (GPS) सुरू ठेवणे तसेच आवश्यक परवानग्या देणे गरजेचे आहे. याशिवाय नोटिफिकेशन सुविधा सुरू ठेवल्यास संभाव्य धोक्याबाबत वेळेवर सूचना मिळू शकतात.

जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या या अॅपद्वारे संबंधित परिसरात वीज पडण्याची शक्यता निर्माण झाल्यास सुमारे १५ मिनिटे अगोदर इशारा दिला जातो. वापरकर्त्याच्या स्थानानुसार विजेची हालचाल आणि संभाव्य धोका दर्शविण्यात येत असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि जीवितहानी टाळण्यास मदत होते.

यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी, आपदा मित्र, सखी, कोतवाल तसेच आशा कार्यकर्त्यांना जनजागृती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मान्सून काळात विशेष सतर्कता बाळगून सर्व नागरिकांनी दामिनी अॅप डाउनलोड करावे आणि विजेच्या धोक्यापासून स्वतःचे तसेच कुटुंबीयांचे संरक्षण करावे, असे आवाहन तहसील प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

वीज पडण्याच्या वेळी घ्यावयाची काळजी

  • उघड्या मैदानात किंवा मोकळ्या जागेत थांबू नये.
  • झाडाखाली आश्रय घेणे टाळावे.
  • मोबाईल, विद्युत उपकरणांचा वापर शक्यतो कमी करावा.
  • सुरक्षित इमारत किंवा घरामध्ये आश्रय घ्यावा.
  • शेतात काम करत असल्यास तातडीने सुरक्षित स्थळी जावे.

संबंधित सामग्री

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या यशस्वी वाटचालीचा नवा टप्पा

चिखलीतील रेणुकामाता पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे दिमाखदार उद्घाटन; ३३ वर्षांच्या वाटचालीचा गौरव, सहकारातील विश्वास आणि ठेवीदारांच्या हितावर मान्यवरांचे भाष्य.

Sep 14, 2026
चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

चिखलीत ८ सप्टेंबरला उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा; लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात चिखली येथे ८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

Sep 05, 2026
बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

बुलढाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा; प्रदेश युवक काँग्रेसची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

खरीप हंगाम सुरू होऊन पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही बुलढाणा जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.

Sep 05, 2026
इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

इसरूळ शिवारात वाघ-बिबट्याची दहशत; कुत्र्यांच्या शिकारीमुळे शेतकरी भयभीत

चिखली तालुक्यातील इसरूळ परिसरातील शिवारात वाघ किंवा बिबट्यासदृश हिंस्र वन्यप्राण्याचा वावर असल्याच्या चर्चेने शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Sep 05, 2026
बाजीप्रभूनगरमध्ये पोलिसांची भेट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

बाजीप्रभूनगरमध्ये पोलिसांची भेट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मलकापूर शहर पोलिसांकडून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध भागात जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.

Sep 04, 2026