दरमहा 3-4 हजारांचे वीज बिल थेट 25,530 रुपयांवर; नागपुरातील ग्राहकाचा महावितरणकडे आक्षेप

स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत.

दरमहा 3-4 हजारांचे वीज बिल थेट 25,530 रुपयांवर; नागपुरातील ग्राहकाचा महावितरणकडे आक्षेप

Electricity Bill

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिलात मोठी वाढ झाल्याचा आरोप; अनेक ग्राहकांकडूनही तक्रारींचा पाऊस

नागपूर (Electricity Bill) : स्मार्ट मीटरमुळे वीज बिलांमध्ये अनपेक्षित वाढ होत असल्याच्या तक्रारी पुन्हा एकदा समोर येऊ लागल्या आहेत. नागपुरातील शंकरनगर परिसरात राहणाऱ्या एका ग्राहकाला दरमहा तीन ते चार हजार रुपये येणाऱ्या वीज बिलाऐवजी मे महिन्यात तब्बल 25 हजार 530 रुपयांचे बिल प्राप्त झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या प्रकरणानंतर स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

शंकरनगर येथील रहिवासी जगजित सिंग यांच्या तीन खोल्यांच्या घरासाठी त्यांच्या पत्नीच्या नावावर वीज मीटर आहे. आतापर्यंत त्यांचे मासिक वीज बिल सरासरी चार हजार रुपयांच्या आसपास येत होते. मात्र, मे महिन्यात मिळालेल्या बिलात तब्बल 1,250 युनिट वीज वापर झाल्याची नोंद असल्याने त्यांना मोठा धक्का बसला.

महावितरणच्या स्लॅब पद्धतीनुसार वीज दर आकारले जातात. 100 युनिटपर्यंत प्रति युनिट 3.96 रुपये दर लागू होतो, तर वापर वाढत गेल्यास दरही टप्प्याटप्प्याने वाढतो. 1,000 युनिटपेक्षा जास्त वापरासाठी प्रति युनिट 17.53 रुपये दर आकारला जातो. याच गणनेनुसार सिंग यांना 1,250 युनिट वापराचे 25 हजार 530 रुपयांचे बिल पाठविण्यात आले आहे.

जगजित सिंग यांच्या म्हणण्यानुसार, यापूर्वी त्यांच्या घराचा वीज वापर कधीही 400 ते 500 युनिटच्या पुढे गेला नव्हता. त्यामुळे अचानक 1,250 युनिट वापर दाखविण्यात आल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून एवढ्या मोठ्या बिलाचा आर्थिक भार कसा पेलायचा, असा सवालही उपस्थित केला आहे.

बिलामध्ये मोठी वाढ झाल्यानंतर सिंग यांनी महावितरणच्या शंकरनगर कार्यालयात तक्रार नोंदवली. त्यानंतर विभागातील अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्या घरी भेट देऊन तपासणी करून गेले. मात्र, अद्याप या संदर्भात कोणताही अंतिम अहवाल किंवा सूचना मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

विशेष म्हणजे, त्यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या स्वतंत्र खोलीसाठी वेगळे वीज मीटर असून त्या मीटरचेही बिल सुमारे 8 हजार रुपये आल्याचे सिंग यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, अशाच प्रकारच्या तक्रारी इतर ग्राहकांकडूनही पुढे येत आहेत. जीएसटी विभागाचे माजी सहाय्यक आयुक्त संजय थूल यांनादेखील मे महिन्यात तब्बल 29 हजार 830 रुपयांचे वीज बिल प्राप्त झाले आहे. याशिवाय, यापूर्वी 500 ते 600 रुपये मासिक बिल येणाऱ्या काही ग्राहकांना आता 3,500 ते 4,000 रुपयांपर्यंत बिले येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

स्मार्ट मीटर बसविल्यानंतर वीज बिलांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचा दावा अनेक ग्राहकांकडून केला जात असून, या तक्रारींमुळे महावितरणसमोर नव्या प्रश्नांची मालिका उभी राहिली आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026
शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील विनापरवानगी आंदोलन CJPला भोवले; अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलकांवर गुन्हा दाखल

शिवाजी पार्कातील CJPच्या विनापरवानगी आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई. अभिजीत दिपके यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल.

Oct 03, 2026