कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा - विजय वडेट्टीवार

सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.

कर्जमाफी फसवी; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा - विजय वडेट्टीवार

Farm Loan Waiver

राज्यात नैतिकतेचा ऱ्हास झाल्याचा आरोप

नागपूर (Farm Loan Waiver): सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही केवळ बनवाबनवी असून, शेतकऱ्यांना प्रत्यक्षात दिलासा मिळत नाही, अशी जोरदार टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केल्याशिवाय कर्जमाफीचा खरा फायदा होणार नाही, अशी ठाम मागणी त्यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

वडेट्टीवार म्हणाले की, सध्याच्या कर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांचे उर्वरित कर्ज कायम राहते. त्यामुळे भविष्यात नवीन कर्ज मिळवताना त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. पीकविमा योजनेतून केवळ विमा कंपन्यांचा फायदा होत असून, शेतकरी मात्र मदतीपासून वंचितच राहत असल्याची टीका त्यांनी केली.

राजकारणातील नैतिकता संपुष्टात

महाराष्ट्रात फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला असून, राजकारणातील नैतिकता संपुष्टात आली आहे. 'आधी डोक्यावर घ्यायचे आणि नंतर पायाखाली तुडवायचे हीच आता फॅशन झाली आहे,' अशा शब्दांत त्यांनी टीका केली. 

सत्ताधारी गोटात सर्व काही सुरळीत नसल्याचे सांगत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचा दावा केला. राज्य कर्जबाजारी होत असताना सत्तेसाठी खेळ सुरू असून, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबई महापालिकेतील नगरसेवक निधीच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप केला. विकास निधी वाटप करताना सर्वांना समान न्याय मिळणे आवश्यक असताना विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना निधी न देणे ही लोकशाहीसाठी घातक बाब असल्याचे ते म्हणाले.

 

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026