अन्यथा १५ ऑगस्टला लाक्षणिक मुक आंदोलनाचा इशारा!
मानोरा (Gavha KondaVada) : तालुक्यातील मौजे गव्हा येथील कोंडवाडा सुरू करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी दि. १० ऑगस्ट रोजी गटविकास अधिकारी, यांना निवेदन देवून येत्या १३ ऑगस्ट पर्यंत न्याय द्यावा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी आपल्या दालनासमोर एकदिवसीय लाक्षणिक मुक आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
ग्रामस्थ विवेक शामसुंदर डुकरे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गव्हा ग्रामपंचायतचे सचिव आणि ग्रामस्थांनी ३० जुलै २०२६ रोजी गटविकास अधिकारी यांना कोंडवाडा सुरू करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी झालेल्या ग्रामपंचायतच्या विशेष सभेत कोंडवाडा सुरू करण्याचा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेत सचिवांनी तोंडी आश्वासन देवून लवकरच कोंडवाड्यासाठी जागा निश्चित करून काम सुरू केले जाईल. असे आश्वासन दिले होते.
मात्र या (Gavha KondaVada) घटनेला बराच मोठा कालावधी उलटूनही अद्याप कोंडवाड्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. कोंडवाड्याचे काम येत्या १३ऑगस्ट पर्यंत सुरू करावे. अन्यथा १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी कार्यालयासमोर सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लाक्षणिक मुक आंदोलन केले जाईल. असे निवेदन गट विकास अधिकारी यांना दिले आहे.