हिंगोली (Hingoli Police Force) : हीच जिद्द आणि कष्टाच्या जोरावर हिंगोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या ६५ नवनियुक्त युवकांसाठी जिल्हा पोलीस दलाने कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. भरती प्रक्रियेतून निवड झालेल्या या सर्व भावी पोलिसांच्या राहण्याची उत्तम सोय पोलीस दलातर्फे करण्यात आली आहे. लवकरच या जवानांचा खडतर प्रशिक्षण काळ (ट्रेनिंग पिरेड) सुरू होत आहे. दिवसभराच्या कठोर प्रशिक्षणानंतर या जवानांना रात्री उत्तम विश्रांती मिळावी, या उद्देशातून प्रशासनाने त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी विशेष व्यवस्था केली आहे. ६५ जवानांना झोपण्यासाठी नवीन आरामदायी पलंग तयार करून घेतले जात आहेत.
प्रशिक्षण काळातील सोयींवर भर अधिक भर दिला जात आहे. कारागिरांकडून काम युद्धपातळीवर सुरू
पोलीस दलात (Hingoli Police Force) दाखल होणाऱ्या या नव्या दमाच्या शिपायांचे स्वागत करण्यासाठी पोलीस मुख्यालय सज्ज झाले आहे. सध्या मुख्यालयाच्या आवारात स्थानिक कारागिरांकडून हे पलंग तयार करण्याचे काम अत्यंत वेगाने व युद्धपातळीवर सुरू आहे. कठोर मेहनतीनंतर वर्दीचे स्वप्न पूर्ण केलेल्या या युवकांना उत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी पोलीस प्रशासन विशेष काळजी घेत आहे. पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील आणि नियोजनबद्ध भूमिकेमुळे नवनियुक्त जवान आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण पहायला मिळत आहे.
हिंगोली पोलीस दलाचा कौतुकास्पद पुढाकार; ६५ जवानांच्या विश्रांतीसाठी सुसज्ज पलंग तयार
Hingoli Police Force: हिंगोली जिल्हा पोलीस दलाने ६५ नवनियुक्त पोलिस युवकांना प्रशिक्षणपूर्व विश्रांतीसाठी विशेष पलंग तयार करण्याचा कौतुकास्पद पाऊल उचलला आहे.
Hingoli Police Force
संबंधित सामग्री
नवीन कायद्यांच्या अंमल बजावणीत हिंगोली पोलीस महाराष्ट्रात प्रथम, देशात १९ वे
Hingoli Police:
जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण का करतो म्हणत शिवीगाळ, मारहाण
Hingoli Police Crime Case: तू आमच्या विरोधात उपोषण का करतो या कारणावरून शिवीगाळ करून थापडा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद
वाहनावर दंड आकारल्याच्या कारणातून शहर वाहतुक शाखेच्या पोलिसाला मारहाण
Hingoli police assault case: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला गाडीवर दंड आकारल्याच्या रागातून लोखंडी काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे.
हिंगोलीतील पोलिस वसाहतीची सुरक्षा धोक्यात; पोलिस उपनिरीक्षकांच्या निवासस्थानी घरफोडी
Hingoli Police Colony Burglary: पोलिसांच्या नाकावर टिच्चून चोरट्यांनी चोर्यांचे सत्र सुरुच ठेवले आहे. शहरातील नवीन पोलिस वसाहतीमधील पोलिस उपनिरीक्षकाचे घर फोडून चोरट्यांनी २ लाख ९४ हजार रुपयाचा ऐवज
हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्बशोधक व नाशक पथकात 'जॅक'चे आगमन
Hingoli Police Force: जिल्हा पोलीस दलाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकात एका नव्या सदस्याचे आगमन झाले आहे. बॉम्ब व स्फोटक शोधक श्वान पथकात नव्याने दाखल झालेल्या श्वानाचे नामकरण