जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांची गावभेट; विकासकामे, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाचा घेतला सविस्तर आढावा

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शनिवारी (दि. १३ जून) जिल्ह्यातील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देत ‘गावभेटी कार्यक्रम’ राबवला.

जि.प. सीईओ विवेक गायकवाड यांची गावभेट; विकासकामे, आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षणाचा घेतला सविस्तर आढावा

Hingoli ZP CEO

हिंगोली (Hingoli ZP CEO) : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी शनिवारी (दि. १३ जून) जिल्ह्यातील विविध गावांना प्रत्यक्ष भेट देत ‘गावभेटी कार्यक्रम’ राबवला. या दौऱ्यात त्यांनी समगा, दुर्ग धामणी, येडूत आणि वसई या गावांमध्ये सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून विविध योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला.

या दौऱ्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) केशव गडापोड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) विजय बोराटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा कृषी अधिकारी अतुल वायसे, कार्यकारी अभियंता राजू नरवाडे, प्रियंका राजपूत, सहायक गट विकास अधिकारी प्रदीप बोंढारे, विष्णू भोंजे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड आणि डॉ. गजानन चव्हाण उपस्थित होते.

दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान, माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियान, विकसित भारत योजना, घरकुल योजना, जल जीवन मिशन, स्मशानभूमी शेड उभारणी तसेच घनकचरा व्यवस्थापन यांसह विविध महत्त्वाकांक्षी योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तटबंद वळण कालवे, पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन आणि नियोजनबाबत संबंधित अधिकारी व ग्रामपंचायतींना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाबाबत मार्गदर्शन करताना विवेक गायकवाड यांनी गाव स्वच्छतेवर विशेष भर दिला. गावात उघडी गटारे नसावीत, घनकचऱ्याचे चार प्रकारांनुसार व्यवस्थापन व्हावे आणि कचरा साठवण्यासाठी एकच निश्चित जागा असावी, असे त्यांनी सांगितले. गावाने ५९ निकषांवर शंभर टक्के काम करून ७० टक्क्यांहून अधिक गुण मिळविल्यास राज्यस्तरीय ५ कोटी रुपयांचे पारितोषिक मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले.

पर्यावरण संवर्धनासाठी ‘एक पेड़ माँ के नाम’ या मोहिमेचा उल्लेख करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगवावे आणि गावांमध्ये नाविन्यपूर्ण वृक्षारोपण उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.

गायकवाड यांनी गावांतील अंगणवाडी केंद्रे आणि शाळांनाही भेट दिली. अंगणवाडीतील बालकांच्या शैक्षणिक प्रगतीची पाहणी करत त्यांनी मुलांशी संवाद साधला. तसेच बालकांना दिल्या जाणाऱ्या आहाराची गुणवत्ता तपासण्यासाठी स्वतः आहार चाखून पाहिला.

येडूत येथील आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन त्यांनी औषध साठ्याची तपासणी केली. समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी मुख्यालयात राहून नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे बंधनकारक असल्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेचीही पाहणी करण्यात आली.

वसई येथे ग्रामपंचायतस्तरीय आढावा बैठक पूर्ण झाल्यानंतर त्यांनी जिल्हा परिषद शाळेला भेट देत वृक्षारोपण केले. शाळेतील सुविधांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पुढील वर्ग मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

संबंधित सामग्री

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

दाटेगावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची राज्यस्तरीय पाहणी

ताओ दाटेगाव येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीची राज्यस्तरीय पाहणी समितीने ५ सप्टेंबर, शनिवार रोजी पाहणी केली.

Sep 05, 2026
आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

आमदार सावरकर विकासासाठी झटणारा धडपडया माणूस: शंकरराव वाकोडे

MLA Savarkar: आमदार सावरकरांनी पांदन शेत रस्त्यांचे रूपांतर डांबरीकरण रस्त्यात करून, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेली समस्या कायम स्वरूपात सोडविल्याने आमदार सावरकरांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

Aug 30, 2026
अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

अधिकारांविना प्रशासक निष्प्रभ; पातूर तालुक्यातील विकासकामे ठप्प

पातूर तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली.

Aug 14, 2026
कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

कोटगुलमध्ये आमदारांचा ‘गुप्त’ दौरा वादात; ट्रान्सफॉर्मर उद्घाटनावरून संताप, जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्षाचा आरोप

आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा कोरची तालुक्यातील अतिदुर्गम कोटगुल परिसरातील दौरा चांगलाच वादग्रस्त ठरला आहे.

Aug 07, 2026