हिंगोली वैद्यकिय महाविद्यालय

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

Hingoli Medical College: हिंगोलीत एमआरआय सेंटरमध्ये रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याच्या आरोपावर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कार्यालयात बैठक करून चालकाला फटकारले.

हिंगोलीच्या शासकीय वैद्यकिय महाविद्यालयातील एमआरआय सेंटर चालकास जिल्हाधिकाऱ्यांनी फटकारले

Hingoli Medical College


रुग्णाच्या तक्रारीची जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतली तत्परतेने दखल
रुग्णांची आर्थिक लुट झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील

हिंगोली (Hingoli Medical College) : हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एमआरआय विभागात रुग्णांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी २९ मे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत सेंटर चालकाला चांगलेच फटकारले. रुग्णांची लुट झाल्यास गंभीर परिणाम होतील असा सज्जड दम त्यांनी दिला. त्यानंतर सेंटर चालकाच्या वरिष्ठांनी माफी मागितल्यानंतर वादावर पडदा पडला.

हिंगोली शहरातील तिरुपती नगर भागातील रहिवासी वसंत यांनी त्यांची पत्नी सुवर्णा वाघ यांना २७ मे बुधवारी एमआरआय करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आणले होते. यावेळी वसंत वाघ यांनी  सकाळी ९:३० वाजता एमआरआय कक्षात विचारणा केली असता, त्यांना प्रथम १७०० रुपये भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पुन्हा २१५० रुपयांची मागणी केली तर तिसऱ्यावेळी ६४०० रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार त्यांच्याकडून सदर रक्कमही घेण्यात आली. या प्रकारानंतर वसंत वाघ यांनी वैद्यकीय रुग्णालय प्रशासनाकडे निवेदन देऊन रुग्णांची आर्थिक लुट होत असल्याचा आरोप केला.

सदर प्रकरण जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी गांभीर्याने घेऊन या प्रकरणात २९ मे बुधवार रोजी तातडीने बैठक घेतली. यावेळी तक्रारदार वाघ यांच्यासह रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक नितीन तडस तसेच एमआरआय सेंटरच्या कृष्णा डायग्नोस्टीकचे राज्याचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर तक्रारदार वसंत वाघ, अधिष्ठाता डॉ. मुंगल यांच्याकडे विचारणा केली. त्यानंतर कृष्णा डायग्नोस्टीकच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी त्यांनी सेंटर चालकाला चांगलेच फटकारले.

शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात एमआरआयसाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय व आर्थिक लुट होता कामा नये. यापुढे असे प्रकार होऊ नये याची दक्षता घ्यावी अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील अशा शब्दात त्यांनी सज्जड दम दिला. त्यानंतर सेंटर चालकांनी माफी मागितली. यानंतर असे प्रकार होणार नाही असे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला आहे.

संबंधित सामग्री

लातूरमध्ये शिक्षण संस्था चालकाची गोळी झाडून आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूरमध्ये शिक्षण संस्था चालकाची गोळी झाडून आत्महत्या; शिक्षण क्षेत्रात खळबळ

लातूरमधील डॉ. चंद्रभानू सोनवणे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रमुख संस्थाचालक संजीव सोनवणे यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Sep 15, 2026
शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

शेतकरी पुत्राची आभाळाला झेप; चार पिढ्यांनंतर नळगीर तांड्यात पहिला डॉक्टर!

रोहित दिलीप पवार नीट परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे.

Sep 05, 2026
हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

हिंगोली शासकीय रुग्णालयात गुंतागुंतीची जबड्याची शस्त्रक्रिया यशस्वी

शासकीय जिल्हा रुग्णालय तथा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, हिंगोली येथे रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाच्या जबड्याची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली.

Sep 03, 2026
खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर नियंत्रणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करा

गोरगरीब, वंचित तसेच सर्वसामान्य नागरिकांना उपचाराचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून विविध आरोग्यविषयक योजना राबविण्यात येत आहेत.

Aug 28, 2026
इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

इंडियन मेडिकल असोसिएशनचा परवाना नसलेल्या लॅब जवळा बाजारात सुरू

Indian Medical Association: रक्त तपासणी करणार्‍या आठ मेडिकल लॅब कार्यरत असून बहुतेक जणांकडे इंडियन मेडिकल असोसिएशनचा मान्यताप्राप्त परवाना नसताना रक्त तपासणीचा गोरख धंदा सुरू

Aug 12, 2026