उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर यांच्याकडून रुग्णालयाची झाडाझडती

रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान करण्यात आलेल्या या तपासणीत ड्युटीवरील डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर यांच्याकडून रुग्णालयाची झाडाझडती

Hospital Inspection

आरोग्य प्रशासनाचे कामकाज असमाधानकारक असल्याची खेडेकरांची नाराजी

चिखली (Hospital Inspection) : चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार समोर आला असून उपनगराध्यक्ष सौ. वैशालीताई खेडेकर यांनी गुरुवारी (दि. २२ मे) रात्री अचानक रुग्णालयाची झाडाझडती घेत प्रशासनाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील आरोग्य सेवा व प्रशासनाचे काम असमाधानकारक असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

रात्री सुमारे ११ वाजताच्या दरम्यान करण्यात आलेल्या या तपासणीत ड्युटीवरील डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. आपत्कालीन परिस्थितीतही तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध नसल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

यावेळी शिवसेना नेते कपिल खेडेकर हेही उपस्थित होते. रुग्णांची होत असलेली परवड पाहून त्यांनी प्रशासनावर टीका करत, “सर्वसामान्य नागरिकांना वेळेवर उपचार मिळणे हा त्यांचा अधिकार आहे. मात्र आरोग्य यंत्रणा गंभीरतेने काम करताना दिसत नाही,” असे सांगितले.

तपासणीदरम्यान रुग्णालयातील प्रशासकीय गोंधळही समोर आला. वैद्यकीय अधिकारी उमर सैय्यद यांचा प्रभार उमेश सावजी यांच्याकडे, तर त्यांचा प्रभार नंदकिशोर जाधव यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र संबंधित अधिकारी वेळेवर उपस्थित नसल्याचे आढळून आले.

अचानक झालेल्या उपनगराध्यक्षांच्या रुग्णालय भेटीमुळे कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. उपनगराध्यक्ष वैशालीताई खेडेकर यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांशी दूरध्वनीवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. तसेच गैरहजर डॉक्टर व कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणीही केली.

दरम्यान, या घटनेमुळे चिखली उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य सेवेबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रशासनाने तातडीने सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

उद्धव ठाकरे मतदार यादीत कसे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील नोंदीने खळबळ

मराठवाडा पदवीधर मतदार यादीत ‘उद्धव मस्के’ऐवजी उद्धव ठाकरे यांचे नाव आल्याचा दावा. दिलीप घुगे यांनी प्रशासनाकडे तक्रार केली.

Oct 05, 2026
शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

शेतकरी आत्महत्यांवर 'नगदी अनुदान' हाच प्रभावी मार्ग

Shiv Sena Farmers' Conference: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसारखी गंभीर समस्या थांबवण्यासाठी व्यावहारिक मार्ग असल्याचे प्रतिपादन शिवसेना (शिंदे गट) नेते तथा माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026