Jalna ACB

GST विभागातील महिला राज्य कर अधिकारी आणि खासगी कर सल्लागार ६० हजारांची लाच घेताना जेरबंद

जालना जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) मोठी कारवाई करत जीएसटी विभागातील महिला राज्य कर अधिकारी आणि एका खासगी कर सल्लागाराला ₹60 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

GST विभागातील महिला राज्य कर अधिकारी आणि खासगी कर सल्लागार ६० हजारांची लाच घेताना जेरबंद

Jalna ACB

इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनब्लॉक करण्यासाठी सुरुवातीला ₹1 लाखांची मागणी; एसीबीच्या सापळ्यात दोघेही रंगेहाथ अटकेत

जालना जिल्ह्यात भ्रष्टाचारविरोधी विभागाने (ACB) मोठी कारवाई करत जीएसटी विभागातील महिला राज्य कर अधिकारी आणि एका खासगी कर सल्लागाराला ₹60 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांमध्ये राज्य कर अधिकारी सुवर्णा लोहिया आणि खासगी कर सल्लागार अक्षय जैन (लोढा) यांचा समावेश आहे.

एसीबीकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, तक्रारदार व्यावसायिकाचे इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) अनब्लॉक करून देण्यासाठी सुरुवातीला ₹1 लाखांची लाच मागण्यात आली होती. तक्रारीची पडताळणी सुरू असताना 17 जुलै रोजी तक्रारदार जीएसटी कार्यालयात गेला असता, सुवर्णा लोहिया यांनी कॅल्क्युलेटरवर ₹80 हजारांचा आकडा दाखवून लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे.

त्यावेळी कार्यालयात उपस्थित असलेल्या खासगी कर सल्लागार अक्षय जैन यांनीही तक्रारदाराला लाच देण्याचा सल्ला दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीने पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर माहितीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला.

28 जुलै रोजी तक्रारदाराकडून ₹60 हजारांची लाच स्वीकारल्यानंतर सुवर्णा लोहिया यांनी ती रक्कम आपल्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवल्याचे एसीबीच्या कारवाईत निष्पन्न झाले. ठरलेल्या संकेत मिळताच एसीबीच्या पथकाने तातडीने धाड टाकून सुवर्णा लोहिया आणि अक्षय जैन या दोघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई एसीबीचे उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपासादरम्यान दोन्ही आरोपींचे मोबाईल जप्त करण्यात आले असून, त्यामधून आणखी काही आर्थिक व्यवहार किंवा महत्त्वाचे पुरावे समोर येतात का, याची चौकशी सुरू आहे.

या घटनेमुळे जीएसटी विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून, प्रकरणाचा अधिक तपास एसीबीकडून सुरू आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026