आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी रोजच भरतो जनता दरबार

जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेते म्हणून ख्याती असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा भागातील निवासस्थानासमोर दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

आमदार संतोष बांगर यांच्या निवासस्थानी रोजच भरतो जनता दरबार

Janata Darbar

हिंगोलीसह पाच जिल्ह्यांतील दीडशे-दोनशे नागरिक रोज सकाळीच घेतात भेटी; जागेवरच सुटतात समस्या!

हिंगोली (Janata Darbar) : जनतेच्या सुख-दुःखात धावून जाणारे नेते म्हणून ख्याती असलेले कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या वंजारवाडा भागातील निवासस्थानासमोर दररोज सकाळी ‘जनता दरबार’ भरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

केवळ हिंगोली जिल्हाच नव्हे, तर शेजारील वाशिम, बुलढाणा, परभणी, नांदेड आणि बीड अशा विविध जिल्ह्यांतून रोज १५० ते २०० नागरिक आपल्या न्याय्य हक्काच्या आणि वैयक्तिक समस्या घेऊन आमदार बांगर यांच्या दारात येत आहेत.

सकाळी ७ वाजल्यापासूनच नागरिकांची रीघ

आमदार संतोष बांगर यांच्या भेटीसाठी पहाटेपासूनच त्यांच्या निवासस्थानाबाहेर नागरिकांचा गराडा पडतो. सकाळी अगदी ७ वाजेपासूनच विविध भागांतून आलेले नागरिक आपल्या अर्जांसह हजेरी लावतात. यामध्ये शेतीचे प्रश्न, कौटुंबिक अडचणी, प्रशासकीय कामांमधील अडवणूक आणि प्रामुख्याने वैद्यकीय उपचारांशी संबंधित समस्या घेऊन येणाऱ्या गरजू रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो.

‘ऑन द स्पॉट’ सुटतात प्रश्न

या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे आमदार बांगर यांच्या कामाचा ‘झंझावाती’ वेग. निवेदने घेऊन आलेल्या प्रत्येकाचे म्हणणे ते शांतपणे ऐकून घेतात. प्रश्न समजून घेताच ते जागेवरूनच थेट संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा नामांकित रुग्णालयांच्या प्रशासनाला फोन लावतात. त्यांच्या या ‘ऑन द स्पॉट’ कॉलमुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने हलते आणि गरिबांची रखडलेली कामे काही मिनिटांतच मार्गी लागतात.

“आमदार साहेबांकडे गेलं की काम होणारच!”

“आम्ही अनेक दिवसांपासून एका शासकीय कामासाठी चकरा मारत होतो, पण आमदार बांगर यांनी एका फोनवर आमचा प्रश्न सोडवला,” अशी भावना वाशिमवरून आलेल्या एका नागरिकाने व्यक्त केली.

“बांगर साहेबांकडे गेलं की हक्काने काम होतं, तिथे कुणी रिकाम्या हाताने परतत नाही,” असा दृढ विश्वास आता जनमानसात निर्माण झाला आहे.

‘कार्यसम्राट’ पदवी सार्थ

वैद्यकीय उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देणे असो की तात्काळ उपचार सुरू करणे, आमदार बांगर स्वतः वैयक्तिक लक्ष घालून ते काम पूर्णत्वास नेतात. त्यांच्या याच तत्परतेमुळे आणि ‘लोकाभिमुख’ कार्यपद्धतीमुळे नागरिकांनी त्यांना ‘कार्यसम्राट आमदार’ ही उपाधी दिली आहे.

दिवसेंदिवस त्यांच्या दारात येणाऱ्या नागरिकांची वाढती संख्या ही त्यांच्या लोकप्रियतेची आणि जनतेच्या त्यांच्यावरील अढळ विश्वासाची साक्ष देत आहे.

संबंधित सामग्री

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना; केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रवेशाच्या चर्चांना पुन्हा उधाण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील संभाव्य प्रवेशाच्या जुन्या चर्चांना या दौऱ्यामुळे पुन्हा जोर आला आहे.

Oct 07, 2026
MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टाची नाराजी; ‘आंदोलन मागे घ्या, कॉलेजमध्ये परत जा’, विद्यार्थ्यांना सूचना

पुण्यातील MPSC आंदोलनावर मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन अभ्यासावर लक्ष द्यावे, असे न्यायालयाने सांगितले.

Oct 07, 2026
सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण; ‘देशासमोर सत्ता सुख काहीही नाही’, पंतप्रधान मोदींची भावना

नरेंद्र मोदींच्या सार्वजनिक जीवनाला २५ वर्षे पूर्ण झाली. जनतेच्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी देशसेवा आणि ‘राष्ट्र प्रथम’चा दृष्टिकोन मांडला.

Oct 07, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026