Journalist Protection Act

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर गुन्हा दाखल करा!

मराठी पत्रकार संघांतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. २६ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले.

पत्रकारांना धमकी देणाऱ्या खासदारावर गुन्हा दाखल करा!

Journalist Protection Act

पत्रकार संरक्षण कायद्यान्वये कठोर कारवाईच्या मागणीसाठी चिखली तालुका पत्रकार संघाचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्र्यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन

चिखली (Journalist Protection Act) : ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिवीगाळ करत मारहाणीची धमकी दिल्याच्या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, त्यांच्याविरुद्ध पत्रकार संरक्षण कायद्यान्वये तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार संघांतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने शुक्रवारी (दि. २६ जून) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिखली पोलीस स्टेशनमार्फत निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खासदार संजय दिना पाटील यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्या वादग्रस्त विधानाबाबत स्पष्टीकरण विचारले असता पत्रकारांना अर्वाच्य शिवीगाळ केली तसेच, "पुन्हा विचारायला आलात तर मारून पाठवीन," अशी उघड धमकी दिली. हा प्रकार लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला असून पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पत्रकारांना निर्भयपणे कर्तव्य बजावता यावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायद्यासह लागू असलेल्या कायद्यांनुसार संबंधित खासदाराविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण गावंडे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

यावेळी ज्येष्ठ पत्रकार संतोष लोखंडे, कैलास गाडेकर, रमाकांत कपूर, रविंद्र फोलाने, इफ्तेखार खान, सचिव महेश गोंधणे, कोषाध्यक्ष छोटू कांबळे, संघटक भरत जोगदंडे, सहसचिव रमिझ राजा, कमलाकर खेडेकर, योगेश शर्मा, सय्यद साहिल, राजेश बिडवे, किरण शेजोळ, ऋषी भोपळे यांच्यासह चिखली तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

"पत्रकारांना धमकावणे, शिवीगाळ करणे आणि मारहाणीची भाषा करणे हा लोकशाहीतील चौथ्या स्तंभावर थेट हल्ला आहे. पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात असताना अशा घटनांकडे दुर्लक्ष होणे दुर्दैवी आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही आमची ठाम मागणी आहे. संबंधितांवर त्वरित गुन्हा दाखल न झाल्यास अखिल भारतीय मराठी पत्रकार संघांतर्गत चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील," असा इशारा चिखली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन फुलझाडे यांनी दिला.

संबंधित सामग्री

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

डोंगरकडा फाटा येथे एक तास रास्तारोको आंदोलन

Dongarkada Rastaroko Andolan: महाराष्ट्र शासनाने दुष्काळ जाहीर केल्या नंतर प्रशासनाने पंचनामे करत असल्याने दि 6 ऑक्टोबर रोजी डोंगरकडा फाटा येथे नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्ग रास्तारोको आंदोलन..

Oct 06, 2026
चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

चिखलीतील कुख्यात गुंड ईश्वर धनवटे वर्षभरासाठी कारागृहात स्थानबद्ध

Chikhli gangster Ishwar Dhanwate: शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चिखली पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरुद्ध धडक कारवाई सुरू ठेवली आहे. अंतर्गत विविध गंभीर गुन्ह्या

Oct 06, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी तातडीच्या उपाययोजना

MLA Shweta Mahale: बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी व पशुपालकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेता महाले पाटील

Oct 05, 2026
जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026