Maharashtra IPS Officers

महाराष्ट्रात १२ नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; ३१ ऑगस्टपासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेले १२ परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी लवकरच महाराष्ट्र संवर्गात कार्यभार स्वीकारणार आहेत.

महाराष्ट्रात १२ नव्या आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती; ३१ ऑगस्टपासून उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार

Maharashtra IPS Officers

हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीतील प्रशिक्षण पूर्ण; १२ पैकी पाच महिला अधिकाऱ्यांचा समावेश

मुंबई : हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण केलेले १२ परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी लवकरच महाराष्ट्र संवर्गात कार्यभार स्वीकारणार आहेत. राज्याच्या गृह विभागाने या अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत शासन निर्णय जारी केला असून, ३१ ऑगस्टपासून ते उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून सेवेत रुजू होणार आहेत.

नियुक्ती मिळालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पाच महिला आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सर्व अधिकाऱ्यांची रत्नागिरी, यवतमाळ, चंद्रपूर, लातूर, परभणी, वर्धा, गडचिरोली, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, भंडारा आणि नागपूर जिल्ह्यांतील विविध ठिकाणी पदस्थापना करण्यात आली आहे.

या १२ अधिकाऱ्यांपैकी सहा अधिकारी २०२३ च्या तुकडीतील असून, उर्वरित सहा अधिकारी २०२४ च्या तुकडीतील आहेत.

परिविक्षाधीन आयपीएस अधिकारी आणि पदस्थापना

  • अरांक्षा यादव – रत्नागिरी
  • गुरव गंगाधर कायांदे पाटील – उमरखेड (यवतमाळ)
  • कुमार सुशांत – राजूरा (चंद्रपूर)
  • मेघना आय. एन. – लातूर (ग्रामीण)
  • राहुल कुमार – परभणी शहर
  • राहुल रमेश आत्राम – आर्वी (वर्धा)
  • सागर संजय भामरे – भामरागड (गडचिरोली)
  • ईशानी आनंद – अचलपूर (अमरावती)
  • जान्हवी बाळासाहेब शेखर – गंगापूर (छत्रपती संभाजीनगर)
  • सारदा तेजस सुदिप – भंडारा
  • शशांत एन. एम. – कामठी (नागपूर ग्रामीण)
  • सुयश कुमार सिंग – धानोरा (गडचिरोली)

हैदराबाद येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर या सर्व परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना महाराष्ट्रात जबाबदारी देण्यात आली आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार ३१ ऑगस्टपासून संबंधित अधिकारी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून रुजू होणार आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJP आंदोलनात ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; शिवाजी पार्क फोरमची दिपकेंवर गंभीर कारवाईची मागणी

CJPच्या शिवाजी पार्क आंदोलनात ७५ वर्षीय गोपालकृष्ण पिल्लईंचा हार्ट अटॅकने मृत्यू. अभिजीत दिपकेंविरोधात हत्येच्या गुन्ह्याची मागणी; आयोजकांवरही FIR.

Oct 04, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026