प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे निधन;आज बुधवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी

गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय मधील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे दुःखद निधन झाले.

प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे निधन;आज बुधवारी सायंकाळी ६ वाजता अंत्यविधी

Obituary News

गडचिरोली (Obituary News) : गडचिरोली येथील शिवाजी महाविद्यालय मधील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ. कैलाश भांडारकर यांचे आज, बुधवार, २९ एप्रिल रोजी सकाळी १०.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री त्यांच्या छातीत हलक्या वेदना जाणवत होत्या. मात्र मस्क्युलर पेन समजून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. दररोजच्या दिनक्रमाप्रमाणे ते आज सकाळी मॉर्निंग वॉकलाही गेले होते. त्यानंतर घरी परतल्यावर छातीत वेदना वाढल्याने त्यांना तातडीने एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.

डॉ. भांडारकर हे प्रभावी वक्ते, सतत हसतमुख राहणारे आणि अत्यंत मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. मित्रपरिवारातही त्यांचा मोठा गोतावळा होता. त्यांच्या निधनामुळे शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तसेच मोठा आप्तपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज बुधवारी सायंकाळी ६.०० वाजता कठानी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

‘सुधारित Form 6 ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नाही’; CJI सूर्यकांतांचे मोठे स्पष्टीकरण

सुधारित Form 6ला सुप्रीम कोर्टाची मंजुरी नसल्याचे CJI सूर्यकांत यांनी स्पष्ट केले. SIRच्या १४ निर्णयांवर याचिकेत सवाल; निवडणूक आयोगाला नोटीस.

Oct 05, 2026
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो; संजय राऊतांचा ‘राजकीय षडयंत्रा’चा आरोप

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात निखिल पवारचा एकनाथ शिंदेंसोबतचा फोटो समोर आला. संजय राऊतांनी राजकीय षडयंत्राचा आरोप केला असून सुषमा अंधारेंनीही चौकशीची मागणी केली.

Oct 03, 2026
दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; पोलीस ठाण्यात मुलाच्या मृत्यूची बातमी कळताच वडिलांना धक्का

दिवेआगर समुद्रकिनारी आळंदीतील ‘विनर्स अ‍ॅकॅडमी’च्या ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये पोलीस पाटील युवराज वहिले यांच्या मुलाचा समावेश आहे.

Oct 03, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शरद पवारांचा बारामती दौरा; ३ नोव्हेंबरला मोदींचा बारामतीत दौरा

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेत शरद पवारांचा बारामती दौरा सुरू आहे. दरम्यान, ३ नोव्हेंबरला PM मोदी ‘प्रेरणास्थळा’च्या उद्घाटनासाठी बारामतीत येणार आहेत.

Oct 03, 2026