Open Pit

अमरावतीत जल जीवन मिशनच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप

जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात जल जीवन मिशनच्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यात पडून अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

अमरावतीत जल जीवन मिशनच्या खड्ड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; निष्काळजीपणावर ग्रामस्थांचा संताप

चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील दुर्घटना; सूचना फलक नसल्याचा आरोप, संबंधितांवर कारवाईची मागणी

अमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावात जल जीवन मिशनच्या कामादरम्यान खोदलेल्या खड्ड्यात पडून अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेच्या निष्काळजीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मृत चिमुकलीचे नाव नायरा संजू बुसुम असे असून, कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ती पडल्याची माहिती आहे. पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचले होते. त्याचदरम्यान खेळत असताना नायरा त्या खड्ड्यात पडली आणि तिचा मृत्यू झाला.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ज्या ठिकाणी काम सुरू होते त्या परिसरात काम सुरू असल्याची कोणतीही सूचना, इशारा फलक किंवा सुरक्षा व्यवस्था नव्हती. त्यामुळे ही दुर्घटना टाळता आली असती, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे सरकारी कामांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाची जल जीवन मिशन योजना राबवली जात आहे. मात्र, अशा कामांदरम्यान आवश्यक सुरक्षा उपायांकडे दुर्लक्ष झाल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात, याकडे या घटनेने लक्ष वेधले आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत मुसळधार पावसादरम्यान उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या घटनेतही योग्य सूचना फलक नसल्याचा मुद्दा पुढे आला होता. आता अमरावतीतील कोरडा गावातील दुर्घटनेनंतर सार्वजनिक कामांमध्ये सुरक्षा नियमांचे पालन कितपत केले जाते, याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026