मोकाट कुत्रे हल्ला

परभणीतील पाथरीत मोकाट कुत्र्याचा पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला

Stray Dogs ​​Attack: पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहर्‍यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना

परभणीतील पाथरीत मोकाट कुत्र्याचा पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला

Stray Dogs ​​Attack

 

चेहरा, मानेला गंभीर दुखापत; महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळील घटना

परभणी (Stray Dogs ​​Attack) : पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहर्‍यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महावितरणमध्ये लाईनमन म्हणून कार्यरत असलेले रणजीत देशमुख यांची मुलगी स्वराली (वय ५) ही मंगळवार ७ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वा. सुमारास घराजवळ खेळत असताना गल्लीतील मोकाट कुत्र्यांपैकी एका कुत्र्याने अचानक तिच्यावर झडप घालत चेहर्‍यावर, नाकाजवळ तसेच मानेजवळ चावा घेतला. या (Stray Dogs ​​Attack) हल्ल्यात ती जखमी झाली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने पाथरी येथील वरद हॉस्पिटलमध्ये या खाजगी दवाखान्यात दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. 

महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीच्या परिसरात पाच ते दहा मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याचे नागरिकांनी सांगितले. या कुत्र्यांमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच पादचार्‍यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने (Stray Dogs ​​Attack) मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

संबंधित सामग्री

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

हिंगोलीतील मोकाट जनावर,भटक्या कुत्र्यासह आदींचे ठराव पारीत

Hingoli Stray Animals: हिंगोली नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत केंद्रीय निवारण केंद्र, जनावरांची ठिकाने, भु-नक्शा मोजणी व इतर १६ ठरावांना एकमताने पारित केला.

Aug 25, 2026
परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant woman Death: जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Aug 09, 2026
रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

रिसोड नगर परिषदेची रस्त्यावरील मोकाट जनावरांवर धडक कारवाई; १२ नागरिकांकडून दंड वसूल

रिसोड शहर आणि मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे व गाई ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत होता.

Aug 08, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे नगर परिषदेला निवेदन

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाविरोधात इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे नगर परिषदेला निवेदन

Chikhli Nagar Parishad: भटक्या, हिंस्त्र व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता वावर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका, इंडियन रेडक्रॉस सोसायटी, बुलढाणा यांनी चिखली नगर परिषदेकडे निवेदन सादर केले.

Jul 07, 2026