अवैध दारूसाठा जप्त

बोल्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा अवैध दारूसाठा पकडला; ८७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Illegal liquor stock seized: आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात केशव शिंदे इत्यादींच्या विरुद्ध एका व्यक्तीवर दारूची अवैध वाहतूक पकडली. जप्त केलेल्या मुद्देमालचा किमान ८७,५०० रु होता.

बोल्डा शिवारात दुचाकीवरून जाणारा अवैध दारूसाठा पकडला; ८७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Illegal liquor stock seized


आखाडा बाळापूर (Illegal liquor stock seized) : येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोल्डा बीटमधील बोल्डा शिवारात आज सकाळी दुचाकीवरून नेत असलेला अवैध दारूसाठा जप्त करून एका व्यक्तीविरुद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, १२ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी आणि वसमत तालुक्यांना जोडणाऱ्या मौजे बोल्डा ते पांगरा शिंदे जाणाऱ्या रस्त्यावरील बोल्डा शिवारात स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना विक्रीसाठी देशी दारूची वाहतूक करत असताना स्कूटरसह एका व्यक्तीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने पकडले. 

त्याच्याकडून १५० देशी दारूच्या बाटल्या, किंमत ७,५०० रुपये व स्कूटर, किंमत ८०,००० रुपये असा एकूण ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस कर्मचारी हरिभाऊ गुंजकर यांच्या फिर्यादीवरून केशव बालाजी शिंदे, रा. पांगरा शिंदे, ता. वसमत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबंधित सामग्री

रात्रीच्या अंधारात ५०-६० जनावरांची तस्करी; ट्रक बंद पडल्याने उघडकीस

रात्रीच्या अंधारात ५०-६० जनावरांची तस्करी; ट्रक बंद पडल्याने उघडकीस

Korachi Livestock smuggling:कोडगुल पोलिस स्टेशन हद्दीतील आंलोडी व कोसमी क्रमांक २ परिसरातून जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करून ती कोरची पोलिस स्टेशन हद्दीतून परराज्यात नेली जात असल्याचा गंभीर

Sep 30, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई

निलंगा तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; दोन ट्रॅक्टर-ट्रॉलींसह ७०० ब्रास वाळू आणि ४५.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त.

Sep 22, 2026
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणलेला १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त; FDAचा ६ तास थरारक पाठलाग

मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणला जाणारा १.१३ कोटींचा प्रतिबंधित गुटखा FDAने जप्त केला. सहा तासांच्या पाठलागानंतर ट्रक ताब्यात; चौघांवर गुन्हा दाखल.

Sep 20, 2026
बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा येथे अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची कारवाई; एक लाख ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त

बासंबा शिवारात अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर पोलिसांनी कारवाई करत ३९ हजार ४० रुपयांची दारू आणि एक लाख रुपयांची कार असा एकूण १ लाख ३९ हजार ४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

Sep 13, 2026
ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

ओडिशाच्या जंगलात सापडले पाच ऑरंगुटान; तस्करीचा संशय

Odisha Orangutan Trafficking: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील जंगल परिसरात पाच तरुण ऑरंगुटान आढळून आल्याने वन विभागासह वन्यजीवप्रेमींमध्ये खळबळ उडाली आहे. भारतात नैसर्गिकरित्या आढळत नसलेल्या

Sep 10, 2026