लखन सिंह ठाकूर

बियाणे कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकरी अडचणीत

Lakhan Singh Thakur: वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बियाणे कंपन्यांच्या जाचक अटींमुळे आर्थिक अडचणीत. लखन सिंह ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांकडे कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता तपासणीसाठी निवेदन केले.

बियाणे कंपन्यांच्या जाचक अटींमुळे शेतकरी अडचणीत

Lakhan Singh Thakur

 

कारवाईसाठी लखन सिंह ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

रिसोड (Lakhan Singh Thakur) : वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बियाणे कंपन्यांच्या धोरणांमुळे आणि जाचक अटींमुळे मोठ्या अडचणीत सापडत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव (उत्तर भारतीय) लखन सिंह ठाकूर (Lakhan Singh Thakur) यांनी याप्रश्नी आवाज उठवला असून, राज्य सरकारने यात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

​बियाण्यांच्या वाढत्या किमती आणि त्या तुलनेत अपेक्षित दर्जा न मिळणे यामुळे उत्पादनात मोठी घट होत असून शेतकऱ्यांचे अतोनात आर्थिक नुकसान होत आहे. वाढत्या खर्चाच्या तुलनेत उत्पन्न न मिळाल्याने बळीराजा आधीच आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच बियाणे कंपन्यांकडून करण्यात येणाऱ्या करारांमध्ये अत्यंत कठोर अटी लादल्या जात असून त्यात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोप लखन सिंह ठाकूर (Lakhan Singh Thakur) यांनी केला आहे.

​अनेक शेतकऱ्यांना या करारांमधील कायदेशीर आणि किचकट अटी समजत नसल्याने बियाणे कंपन्यांकडून त्यांचा सर्रास गैरफायदा घेतला जात असल्याचेही त्यांनी या निवेदनात ​मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या प्रमुख मागण्या मध्ये ​बाजारपेठेतील बियाण्यांची कठोर आणि पारदर्शक गुणवत्ता तपासणी करण्यात यावी. ​शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या आणि पिळवणूक करणाऱ्या दोषी बियाणे कंपन्यांवर कडक कारवाई करावी. ​शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नवीन आणि स्पष्ट नियमावली त्वरित लागू करावी, आदी आहेत

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

IAS तुकाराम मुंढेंच्या कारवाईची जगभर चर्चा; ‘द न्यू यॉर्क टाइम्स’कडून ‘फूड सेफ्टी रॉकस्टार’ म्हणून गौरव

तुकाराम मुंढेंच्या अन्नसुरक्षा मोहिमेची न्यू यॉर्क टाइम्सने दखल घेतली. मुंबईतील हॉटेल्स आणि खाद्यविक्रेत्यांवरील FDAच्या कारवाईची आंतरराष्ट्रीय चर्चा.

Oct 05, 2026
पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात कॉलेजला गेल्यानंतर २२ वर्षीय तरुणी बेपत्ता; बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचा ई-मेल

पुण्यात २२ वर्षीय तरुणी कॉलेजला गेल्यानंतर बेपत्ता झाली. कुटुंबीयांना ई-मेल पाठवून बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार असल्याचे सांगितले. फुरसुंगी पोलिसांचा शोध सुरू.

Oct 05, 2026