लातूर शिवसेना

शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

Latur Shiv Sena: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक

शिवसेना पक्षसंघटन व्यापक करण्यासाठी कामाला लागा: संपर्क प्रमुख चव्हाण

Latur Shiv Sena

 

माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र उपक्रमांतर्गत बैठक 

लातूर (Latur Shiv Sena) : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या 'माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र' या उपक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात पक्षसंघटन अधिक भक्कम आणि व्यापक करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांनी केले. येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित केलेल्या बैठकीत लातूर शहर, लातूर ग्रामीण, निलंगा, औसा विधानसभा मतदारसंघातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विशेष बैठकीत ते बोलत होते.

मार्गदर्शन करताना रोहिदास चव्हाण पुढे म्हणाले की, १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान शिवसेनेची महाराष्ट्रव्यापी मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात 'गाव तिथे शाखा आणि घर तिथे शिवसैनिक' हे उद्दिष्ट समोर ठेवून काम करणे गरजेचे आहे. पक्षातील निष्ठावंत (Latur Shiv Sena) शिवसैनिकांना शाखाप्रमुख पदापासून ते उपजिल्हाप्रमुख या रिक्तपदावर योग्य न्याय द्यावा, असेही ते म्हणाले.

जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी यांनी शहरातील व ग्रामीण भागातील ज्येष्ठ शिवसैनिकांशी संपर्क साधून, त्यांना आपल्या कार्यात सहभागी करून घेत चर्चा करण्यात यावी, असे आवाहन केले.
यावेळी सहसंपर्कप्रमुख प्रमुख चंद्रनाथ मुरळीकर, जिल्हा समन्वयक पप्पुभाई कुलकर्णी, जिल्हा परिषद सदस्य तानाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख बालाजी जाधव, महिला जिल्हा संघटक जयश्रीताई उटगे, डॉ. शोभाताई बेंजरगे, महानगर प्रमुख विष्णुपंत साठे, शहरप्रमुख माधव कलमुकले, शिवराज मुळावकर, युवासेना जिल्हा अधिकारी दिनेश जावळे औशाचे उपजिल्हाप्रमुख बजरंगदादा जाधव, मुरूडचे  बाळासाहेब डोंगरे, निलंगा तालुका प्रमुख अविनाशदादा रेशमे, शिरूर अनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, ग्रामीण तालुका प्रमुख कैलाश पाटील, तालुका प्रमुख शंकर रांजणकर, ज्येष्ठ  शिवसैनिक देविदास भोसले महादेव भोसले एडवोकेट चंद्रकांत भोसले, आरोग्य सेनेचे त्र्यंबक स्वामी, विधानसभा प्रमुख राजेंद्र कतारे, विष्णु कांबळे, सोमनाथ झुंजारे, अँड. वैभव बिराजदार, अँड. रवी पिचारे , अल्पसंख्यांकचे मुनवरखान पठाण, समद शेख, मारूती सुर्यवंशी, सुरज बाहेती, सिद्धेश्वर जाधव, गणेश गंगणे, करण शिंदे, संतोष माने, सचिन पवार, भिमराव शिंदे, पद्माकर पेंढारकर, बालाजी काळे, सतिश शिवणे, महादेव काळे, पप्पु शिंदे, सतिश जाधव,रवी सुर्यवंशी,  विशाल शिंदे, दत्ता गोरे, सतिश राठोड, संजय हराळकर, लखण बोंडगे, आमोल डोरसिंगे, आण्णासाहेब मिरगाळे, जनार्धन हंचाटे, अक्षय चवळे, अजय घोणे, प्रवीण मगर व ईतर शिवसैनिक पदाधिकारी व शिवसैनिक बांधव या बैठकीस उपस्थित होते.

संबंधित सामग्री

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना थेट आर्थिक मदत द्या: विश्वनाथ सानप यांची मागणी

कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्तांना थेट आर्थिक मदत द्या: विश्वनाथ सानप यांची मागणी

ShivSena Vishwanath Sanap: कर्नाटक सरकारने पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत वर्ग केली असताना, महाराष्ट्रात मात्र दुष्काळ जाहीर करूनही प्रत्यक्ष मदतीबाबत..

Sep 28, 2026
संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई; लातूर जिल्हा बँकेच्या संचालकपदावरून हटवले

बाबासाहेब पाटील यांच्यावर RBIची कारवाई झाली आहे. १० वर्षांच्या संचालकपदाच्या नियमाचा मुद्दा असून, निर्णयाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचे पाटील म्हणाले.

Sep 19, 2026
लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर! 

लातूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्याचा ठराव मंजूर! 

Latur District Drought: लातूर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने खासदार डॉ. शिवाजी काळगे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या (जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती) दिशा समितीच्या बैठक...

Sep 16, 2026
लातूर गॅझेटीअरमधील आडनावांनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या : मराठा क्रांती मोर्चा

लातूर गॅझेटीअरमधील आडनावांनुसार कुणबी प्रमाणपत्र द्या : मराठा क्रांती मोर्चा

लातूर गॅझेटिअरमध्ये नमूद आडनावांनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. याबाबत लातूर जिल्हाधिकारी अशोक बास्टेवाड यांना निवेदन देण्यात आले.

Sep 12, 2026