इंधन दरवाढीविरोधात २५ मे रोजी अकोल्यात ‘वंचित’चा भव्य बैलगाडी मोर्चा; पातूर येथे नियोजन बैठक संपन्न!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचे आवाहन केले आहे.

इंधन दरवाढीविरोधात २५ मे रोजी अकोल्यात ‘वंचित’चा भव्य बैलगाडी मोर्चा; पातूर येथे नियोजन बैठक संपन्न!

Vanchit Bahujan Aghadi

सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणांविरोधात आंदोलनाची हाक

पातूर (Vanchit Bahujan Aghadi) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पेट्रोल-डिझेल बचतीचे आवाहन केले असले, तरी स्वतः मात्र शेकडो गाड्यांचे ताफे आणि मोठ्या रॅली काढून उधळपट्टी करत असल्याचा आरोप करत, जनतेसाठी एक नियम आणि सत्ताधाऱ्यांसाठी दुसरा अशा सरकारच्या दुटप्पी भूमिकेचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २५ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजता अकोला येथे भव्य बैलगाडी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चाच्या पूर्वतयारीसाठी आणि पातूर तालुक्याच्या वतीने जय्यत नियोजन करण्यासाठी २३ मे रोजी दुपारी १:३० वाजता राम नगर, तहसील समोर, श्री राजेश देशमुख यांच्या घरासमोरील अंगणात महत्त्वपूर्ण नियोजन बैठक उत्साहात पार पडली. सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पी धोरणांविरोधात आता रस्त्यावर उतरून एल्गार पुकारण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या नियोजन बैठकीला वंचित बहुजन आघाडीच्या केंद्रीय सदस्या अरुंधती शिरसाठ, केंद्रीय सदस्य तथा जिल्हा समन्वयक ॲड. खतीब, प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर, युवक आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे आणि पश्चिम विदर्भ महासचिव बालमुकुंद भिरड यांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच बैठकीला जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलिंद इंगळे, युवक अध्यक्ष श्रीकांत घोगरे, महासचिव राजकुमार दामोदर, महिला आघाडी अध्यक्षा आम्रपाली खंडारे, महासचिव संगीता अढाऊ, भा. बौ. म. चे महासचिव नंदकुमार डोंगरे, सम्यक अध्यक्ष धीरज इंगळे आणि विद्वत्त सभा अध्यक्ष सिद्धार्थ देवधरीकर प्रामुख्याने उपस्थित होते.

इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडे अर्ज केलेल्या तालुक्यातील व शहरातील सर्व इच्छुक उमेदवारांसह आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी या बैठकीला हजेरी लावली होती. २५ मेचा मोर्चा ऐतिहासिक करण्यासाठी पातूर तालुक्यातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी बैलगाड्यांसह सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

ही बैठक यशस्वी करण्यासाठी पातूर तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ, तालुका महासचिव शरद सुरवाडे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा अर्चना डाबेराव, युवक आघाडी तालुकाध्यक्ष सम्राट तायडे, भा. बौ. म. तालुकाध्यक्ष राजेश सरकटे, तालुका महासचिव गोपाल खंडारे, शहर अध्यक्ष जैद भाई, शहर महासचिव विजय बोरकर, शहर महिला आघाडी अध्यक्षा करुणा गवई, समतावादी विद्यार्थी आंदोलन तालुकाध्यक्ष निखिल उपरवट आणि समता सैनिक दल प्रमुख दिलीप ताजने यांच्यासह वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, युवक आघाडी, विद्वत महासभा, भा. बौ. म. आणि समता सैनिक दल पातूर तालुका व शहर कार्यकारिणीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत; पंतप्रधान मोदींसोबत भेटीची शक्यता, मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार?

एकनाथ शिंदे आज दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तार, MLC निवडणूक, जागावाटप आणि दुष्काळावर चर्चा होणार?

Oct 05, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

शेतकऱ्यांना मोठा दिलासा! शेतीच्या यांत्रिकीकरणाला बळ; डिझेलचा पुरवठा वाढणार..

Farm Mechanization Diesel Supply: हार्मुझच्या सामुद्रधुनीतील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक तेलपुरवठ्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जी-7 देश आपत्कालीन साठ्यातील 10 कोटी बॅरल कच्चे तेल-डिझेल बाजार

Oct 04, 2026
सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सुनेत्राताईंचं आव्हान; अजितदादांचं नाव न घेता निवडणूक लढवा! बंडखोराचं प्रत्युत्तर, दादांना मनातून कसं काढणार?

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीतील बंडखोरी; अजित पवारांच्या नावावरून सुनेत्रा पवार आणि पुरुषोत्तम जगताप यांच्यात शाब्दिक संघर्ष.

Oct 04, 2026
‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

‘संस्था ताब्यात घेतल्या तरी रस्ते जनतेच्या मालकीचे’; उद्धव ठाकरेंचा सरकारला इशारा

गर्जना मोर्चात उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल; SIR, १३ कोटी मतदार आणि ज्ञानेश कुमारांच्या नियुक्तीवर गंभीर सवाल.

Oct 04, 2026