हिंगोली (Revenue Department) : महसूल विभागाच्या विभागीय स्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत जालना येथे करण्यात आले आहे. त्या निमित्त होणाऱ्या सांस्कृतिक स्पर्धेची शुक्रवारी 31 जानेवारीला हिंगोली येथील कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात कलावंतांची निवड केली जाणार आहे. यातून उत्कृष्ट ठरलेले कलावंत विभागीय स्पर्धेत पात्र ठरणार आहेत.
दरवर्षी प्रमाणे यंदाही (Revenue Department) महसूल विभागाच्या वतीने क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे त्यानुसार 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान जालना येथे स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. या स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावरील महसूल चा संघ निवडीकरिता शुक्रवारी सकाळी 11 वाजता कै. शिवाजीराव देशमुख सभागृहात निवड चाचणी घेण्यात त्यामध्ये महसूलच्या अधिकाऱ्यांसह कर्मचारी सहभाग नोंदवून विविध कलेमध्ये सहभाग नोंदवला विशेष म्हणजे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी स्वतः गीत सादर करून कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक कर्मचारी देखील सादर केलेल्या नृत्यांवर थिरकल्याचे दिसून आले.
माधव वाईकर, स्मिता सूर्यवंशी आम्रपाली चंद्रभोरे, व्यंकटी मनुरकर, संदीप डोंगरे, गिरीश आसेगावकर,किरण पावडे, शंभू दुभळकर, मारुती शिरसाट, प्रल्हाद गोटे,दिपाली संघई, सुधाकर सराटे आदी कर्मचाऱ्यांनी आप आपली कला सादर केल्याने उपस्थितांनी कलेला भरभरून दाद दिली. या (Revenue Department) निवड चाचणीत जिल्हाधिकारी अभिनव गोयल उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, अनिल माचेवाड, रामेश्वर रोडगे, मंजुषा मुथा, उपविभागीय अधिकारी विकास माने, तहसीलदार श्रीकांत भुजबळ, शारदा दळवी, जीवक कुमार कांबळे सखाराम मांडवगडे, हरीश गाडे ,जिल्हा खनी कर्म अधिकारी नवीन कुमार माने आदींनी उपस्थिती दर्शवली. स्पर्धेचे सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी अशोक केंद्रेकर यांनी केले.




 
		

