परभणी शहरातील अपना कॉर्नर येथील घटना
आरोपी नानलपेठ पोलीसाने घेतले ताब्यात
परभणी (Parbhani Crime) : शहरातील अपना कॉर्नर येथे शनिवार २५ जानेवारी रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास एका अॅटो चालकाला चाकुने भोसकण्यात आले. जखमीला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान अॅटो चालकाचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाला असून पोलीस शोध घेत आहेत.
या (Parbhani Crime) घटनेविषयी पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी अपना कॉर्नर भागात अॅटोचा कट लागल्यावरुन वाद झाला. या वादात अॅटो चालकावर चाकुने वार करण्यात आले. छातीवर वार झाल्याने गंभीर दुखापत झाली. अॅटो चालकाला उपचारासाठी सुरुवातीला शासकीय रुग्णालय आणि तेथून खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र अॅटो चालकाचा मृत्यू झाला. संतोष तुकाराम पाईकराव वय २२ वर्ष, रा. शाहू नगर, पाथरी रोड असे मयताचे नाव आहे. अॅटो चालक आणि आरोपीचा यापूर्वी देखील वाद झाला होता, अशी माहिती सुत्रांनी दिली.
घटनेची माहिती समजताच पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनकर डंबाळे, पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी काही संशयीतांना ताब्यात घेतले आहे. (Parbhani Crime) सदर प्रकरणी नानलपेठ पोलिसात सायंकाळी उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.