कन्हान (Baliramji Dakhane) : श्री बळीराम दखने हायस्कुल कन्हान येथे विद्यार्थीनीने महान महिलांची वेशभुषा व त्यांच्या कार्याविषयी उपस्थितांना माहिती ़दिली. उत्कुष्ट वेश भुषा व भाषणा देणा-या विद्यार्थ्याना बक्षीष वितरण करून बळीरामजी दखणे यांची जयंती साजरी करण्या त आली.
शिक्षण विकास मंडळ रामटेक द्वारा संचालित विकास प्राथमिक शाळा कन्हान व (Baliramji Dakhane) बळीरामजी दखणे हायस्कूल कन्हान चे संस्थापक अध्यक्ष मा. स्वर्गीय बळीरामजी दखणे उर्फ काकाजी यांची १०५ वी जयं ती निमित्ताने विद्यार्थ्यीनी महान महिलांच्या वेशभूषा करून आल्या. यात विद्यार्थ्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील अशा निरनिराळ्या वेशभूषेत धारण केल्या. प्रथम स्वर्गीय काकाजी यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
तदंतर विद्या र्थ्यीनी ज्या भूमिकेच्या वेशभूषा केलेल्या होत्या त्या भूमिकेतील पात्राविषयी आपल्या भाषणातुन माहिती दिली. याप्रसंगी वर्ग तिसरीच्या विद्यार्थीनी श्रेया चको ले हिने राष्ट्रमाता जिजाऊ चे वेशभूषा व भाषण उत्कृष्ट पणे सादर केले. उपस्थित सर्व पालकांनी प्रमुख पाहु ण्यांनी सुंदर वेशभुषा केलेल्या सर्व विद्यार्थ्यीनीचे कौतुक केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष दखणे हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सचिन अल्लेडवार प्रमुख अतिथी यतीन कुमार पशिने प्रायमरी चे मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत, दखणे हायस्कूलचे पालक सभेचे सचिव गुंडेराव चकोले प्रामुख्याने उपस्थित होते.
उपस्थित अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी स्वर्गीय बळीरामजी दखणे (Baliramji Dakhane) उर्फ काकाजी यांच्या जीवन चरित्र विषयी विस्तृत अशी माहिती दिली. कार्यक्रमात सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी दिलेल्या भाषणाबद्दल व वेशभूषा बद्दल त्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्र माचे सूत्रसंचालन सौभाग्यश्री नखाते मॅडम तसेच आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर बांबल यांनी केले. कार्यक्रमा च्या यशस्वितेकरिता विकास प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक तसेच दखणे हायस्कूल चे सर्व शिक्षक शिक्षके तर कर्मचारी यांनी सहकार्य केले विद्यार्थ्यांना शेंगदाणा , पापडी व चॉकलेट वाटुन कार्यक्रमाची सांगता कर ण्यात आली.