Beed Crime :- बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील दस्तगीर वाडी येथील कृष्णा साळे या मुलास तिघेजण मारहाण (Hitting) करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणात सुरुवातीला कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांकडून दखल
मात्र, घटनेचा व्हिडिओ (Video) व्हायरल होताच, त्याची दखल पोलिसांनी घेतली. या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात माऊली माने, कुणाल घाडगे, शुभम घाडगे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या तिघांनी कृष्णाला एकटे घाटात दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणत मारहाण केली. तसेच तू आता गावातच राहायचे नाही अशी धमकी देखील दिली. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणात गुन्हा नोंदविण्याची मागणी केली जात होती. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला असून, एकाला ताब्यात घेतले आहे. मात्र इतर दोघे अद्याप फरार आहेत.