भंडारा (Bhandara Fire) : भंडार्यातील तापमानाने उच्चांक (Heat wave) गाठले असून सूर्य आग ओकत आहे. दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे (Short circuit) शॉर्टसर्किट होण्याचे प्रमाण वाढले आहे. दि. २९ मे रोजी दुपारी १२:३० वाजता दरम्यान शहरातील जि.प. चौकातील साई मंदिर मार्गावर मोठी दुर्घटना टळली. एका बँकेजवळील विद्यूत खांबाला अचानक आग लागली. पहाता-पहाता (Bhandara Fire) आगीची तिव्रता वाढत असताना शेजारील लोकांच्या आग लागल्याची लक्षात येताच त्या ठिकाणी धाव घेऊन आग आटोक्यात आणले.
भंडार्यात मोठी दुर्घटना टळली
नागरिकांच्या अथक प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. अन् मोठा अनर्थ टळला. ‘‘कशी लागली आग कुणास ठाऊक..!’’ ज्या विद्यूत खांबाला आग लागली त्याला लागूनच बँक, निमशासकीय कार्यालये, दुकाने तर दाट वस्ती आहे. हा परिसर चांगलाच वर्दळीचा आहे. ज्यावेळी आग लागली त्यावेळी नागरिकांची मोठी तारांबळ उडाली. वाढत्या तापमानामुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. तरी लोकांच्या समयसुचकतेमुळे (Bhandara Fire) आग आटोक्यात आणल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे बोलले जात आहे.