गोबरवाही-सुंदरटोला मार्गावरील घटना
गर्रा बघेडा (Bike Accident) : तुमसर तालुक्यातील सुंदरटोला येथील चिखला माईन्स येथील शासकीय कर्मचारी सुरचंद कोडवते (५५) हे दि.१६ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता दरम्यान रात्रपाळीवरील ड्युटी असल्याने दुचाकीत पेट्रोल भरण्यासाठी गोबरवाही येथे गेले होते. परत येत असताना अचानक धावत्या दुचाकीवर झाडाचा फांदा पडल्याने शासकीय (Bike Accident) कर्मचार्याचा झाडाच्या फांद्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरचंद कोडवते हे चिखला माईन्स येथे सरकारी कर्मचारी होते. १६ ऑगस्टच्या रात्री ते ड्युटीवर जाण्यापूर्वी त्यांच्या गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गोबरवाही येथे गेले होते. पेट्रोल भरून परतत असताना, सुंदरटोलाच्या उत्तरेस सुमारे ४ किमी अंतरावर पीडब्ल्यूडी अंतर्गत रस्त्याच्या कडेला उभे असलेले एक मोठे पळसाच्या झाडाचा फांदा अचानक तुटून त्यांच्यावर पडले. सुरचंद काही वेळापर्यंत (Bike Accident) झाडाच्या फांदीखाली दबून राहीले. स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णवाहिकेद्वारे तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेले, परंतु तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृताचा मुलगा आतिश सुरचंद कोडवते (३०) याने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. रस्त्याच्या कडेला लावलेली जीर्ण झाडे वेळेवर तोडली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे (Bike Accident) ही दुर्दैवी दुर्घटना घडली आहे. पावसाळ्यात मोठ्या फांद्या पडण्याची शक्यता आहे, परंतु सा.बां.विभाग याकडे लक्ष देत नाही. संबंधित विभागाने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन मृतक कुटुंबियाला आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.