आसामच्या बिनिता छेत्रीने रचला इतिहास
नवी दिल्ली (Binita Chetry) : आसाममधील रहिवासी बिनिता छेत्री (Binita Chetry) सध्या चर्चेत आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तिने जगभरात भारताचे नाव उंचावले आहे. ती (Britain Got Talent 2025) ब्रिटनच्या गॉट टॅलेंट 2025 या शोची दुसरी उपविजेती ठरल्याची माहिती आहे. या शोच्या अंतिम फेरीत पोहोचणारी बिनिता छेत्री ही पहिली भारतीय ठरली. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (CM Himanta Biswa Sarma) देखील बिनिता छेत्रीच्या यशाने खूप आनंदी आहेत आणि त्यांनी या 9 वर्षांच्या प्रतिभावान मुलीचा सन्मानही केला आहे.
परदेशात धुमाकूळ घालणारी बिनिता छेत्री कोण?
बिनिता छेत्रीने (Binita Chetry) ब्रिटनच्या गॉट टॅलेंट (BGT) 2025 च्या अंतिम फेरीत पोहोचणारी ईशान्य भारतातील पहिली स्पर्धक बनून इतिहास रचला आहे. टॅलेंट शो स्पर्धेच्या उपांत्य फेरीत तिच्या अभूतपूर्व नृत्य सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आणि तिला सर्वाधिक सार्वजनिक मते मिळाली, ज्यामुळे तिला (Britain Got Talent 2025) ग्रँड फिनालेमध्ये स्थान मिळाले.
#WATCH | Guwahati, Assam: Binita Chetry says, "I want to thank everyone for all their love and support… With my hard work and your support, I was able to reach this position and represent India… My experience was very good because all judges were very happy with me, and they… https://t.co/UtQaGL3BgO pic.twitter.com/bDwUb7IgJP
— ANI (@ANI) June 2, 2025
बिनिता छेत्रीने सांगितली तिची यशोगाथा
बिनिता छेत्रीने (Binita Chetry) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी सर्वांचे त्यांच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभार मानू इच्छिते. माझ्या कठोर परिश्रमाने आणि तुमच्या पाठिंब्याने मी या टप्प्यावर पोहोचू शकलो आणि भारताचे प्रतिनिधित्व करू शकलो. माझा अनुभव खूप चांगला होता, कारण सर्व परीक्षक माझ्यावर खूप खूश होते आणि त्यांना सर्वांना मी आवडत होते.
तीन वर्षापासून करते डान्स
बिनिता छेत्री (Binita Chetry) म्हणाली की, “शोच्या परीक्षकांच्या कमेंट्सनी मला आणखी प्रेरणा दिली. मी तीन वर्षांची असताना डान्स करायला सुरुवात केली. मी माझ्या मावशीकडून शिकायला सुरुवात केली होती. मी भारतात दोन रिअॅलिटी शोमध्येही भाग घेतला. मी पुढे नृत्य शिकण्यासाठी जयपूरला गेलो होतो, तिथे माझी हार्दिक रावत सरांशी भेट झाली. त्यानंतर, मी डान्स आयकॉन सीझन 2 मध्ये भाग घेतला ज्यामध्ये मी विजेती झाली. यानंतर माझा (Britain Got Talent 2025) ब्रिटनच्या गॉट टॅलेंटमधील प्रवास सुरू झाला.”