बुलडाणा (Radheshyam Chandak) : बुलढाणा जिल्हा नागरी व पगारदार सेवकांच्या सहकारी पतसंस्था संघ म. बुलढाणा र. न. 114 ह्या संघाच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध संपन्न झाली. यामध्ये संघाचे अध्यक्ष म्हणून राधेश्याम चांडक (Radheshyam Chandak) उपाख्य भाईजी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी जी.जे.आमले, सहाय्यक निबंधक, बुलडाणा यांनी कामकाज पाहिले.
बुलडाणा जिल्हा नागरी व पगारदार पतसंस्था संघाची स्थापना 11 मार्च 1991 रोजी स्थापना करण्यात आली. या संघाच्या 320 पतसंस्था सभासद आहेत. संघ हा जिल्ह्यातील पतसंस्थांना विविध प्रकारच्या सेवा पुरवीत आहे. आदरणीय भाईजी यांच्या नेतृत्वात संघाने आतापर्यंत दैदिप्यमान कामगिरी करून राज्यामध्ये सर्वोत्कृष्ठ संघ म्हणून बुलढाणा जिल्हा पतसंस्था संघाला ओळख निर्माण करून दिली आहे.संघाचे सन 2025 ते 2030 या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक अविरोध पार पडली.
यावेळी संघाचे उपाध्यक्ष म्हणून स्वातीताई वाकेकर व मानद सचिव म्हणून सुरेन्द्रप्रसाद पांडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तसेच नवनिर्वाचित संचालक गोविंद मापारी, पंडितराव देशमुख, मंगेश व्यवहारे, मख्खनलाल मुंदडा, स्वाती अनिल कन्हेर, शंकर सकळकर, दीपक देशमाने, सतीश कायंदे आदींची निवड करण्यात आली. यानंतर (Radheshyam Chandak) पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर प्राधिकृत निर्णय अधिकारी जी. जे. आमले यांनी सर्व निर्वाचित पदाधिकारी व संचालक यांचा सत्कार केला. तसेच संघाच्या उज्वल कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.