बुलढाणा(Buldhana):- शिवसेना (Shivsena)पक्षाचे स्टार प्रचारक शिवसेना नेते तथा केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव हेलिकॉप्टरने (Helicopter) विधानसभा निवडणूकीच्या महायुती उमेदवाराच्या प्रचारासाठी धुळे जिल्हा दाखल झाले आहे.
राज्यभरात प्रचार करण्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्था
त्यांच्यासाठी पक्षाच्या वतीने राज्यभरात प्रचार करण्यासाठी खास हेलिकॉप्टरची व्यवस्था करून देण्यात आली आहे. जाहीर सभा व प्रचारासाठी कालावधी कमी असल्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री(Union Minister of State) ना. प्रतापराव जाधव हेलिकॉप्टरने राज्यभरात करणार प्रचार करणार आहेत.




