पुसद (Child Dead Body) : वसंतनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत जागेश्वर महादेव मंदिरालगत असलेल्या पूस नदीच्या बंधार्याच्या खालील भागात २४ ऑगस्ट च्या दुपारी २ वा. दरम्यान बाहेर गावावरून शहरात भिक्षा मागून उपजीविका करणारे सात ते आठ मुले-मुली हे आंघोळ करण्यासाठी त्या भागात गेले असता. दोन मुले वाहून गेली होती. त्यापैकी (Child Dead Body) काही नागरिकांनी एका मुलाला बाहेर काढले होते. तर एक अंदाजे आठ ते दहा वर्षाचा मस्लम खान असलम खान रा. लालखडी नागपुरी गेट अमरावती. हा मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला होता.
शोध मोहीम राबविण्यात आली होती मात्र हाती काही लागले नाही. अखेर दुसर्या दिवशी २५ ऑगस्ट रोजी सकाळी पूस नदीच्या पात्रात ‘ त्या ‘ मुलाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. नागरिकांच्या मदतीने त्या मुलाच्या मृतदेहास नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले व मृतदेह पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करिता दाखल केला. तर वसंतनगर पो.स्टे. चे ठाणेदार सतीश जाधव, पीएसआय स्वामी यांच्या मार्गदर्शनात उर्वरित मुलांना त्यांच्या गावी नेऊन रात्री सोडण्यात आले. मृतक मुलाचे आई-वडील अजूनही पुसदला आलेले नाहीत. त्यामुळे (Child Dead Body) मृतदेह पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे.