Yawatmal :- देशातील दुसर्या क्रमांकाचा दुर्गा उत्सव मंडळ (Durga Utsav Mandal) यवतमाळ शहरासह जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. २२ सप्टेंबर रोजी आदी शक्तीचे दुर्गा मातेची मोठ्या भक्तिभावाने स्थापना होणार आहे. दुर्गा उत्सव साजरा करण्यासाठी जिल्ह्यातील दूर्गा मंडळाने केलेल्या अर्जांपैकी ४४५ दूर्गा उत्सव मंडळाना १९ सप्टेंबर पर्यंत सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयाने परवानगी दिली आली आहे.
शहरातील रस्ता वाहतूकीत होणार बदल, ४४५ मंडळांना शुक्रवारपर्यंत परवानगी
पुढिल दिवसांत या परवानगी मध्ये अजून दुर्गा उत्सव मंडळांची नोंदणी होणार असून जिल्ह्यातील दुर्गा उत्सव मंडळाची संख्या १००० च्या वर जाण्याची शक्यता आहे. दुर्गात्सवासाठी दुर्गा मंडळांना सहायक धर्मदाय आयुक्त कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह ऑनलाइन नोंदणी करावी लागते. परवानगीसाठी मंडळाला जागेची परवानगी, विद्युत वितरण कंपणीची परवानगी, वर्गणी गोळा करण्याचे सर्व कागदपत्र कार्यालयात जमा करावे लागतात. या सर्व कागदपत्राची तपासणी केल्यानंतर सहायक धर्मदाय आयुक्त त्या मंडळाला परवानगी देतात. मागील वर्षी अश्विन नवरात्रीच्या आदल्या दिवशी १००० च्या मंडळाना परवानगी दिली होती. दरवर्षी १००० च्या जवळपास दूर्गामंडळ परवानगीसाठी अर्ज करीत असतात. नवरात्र उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरु असते. सद्यस्थिती ४४५ दूर्गा मंडळांना परवानी दिल्याची माहिती धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. नवरात्रोत्सवा च्या निमित्ताने शहरात वाहतूक व्यवस्थित बदल होणार असून, या संदर्भातील माहिती प्रशासनाकडून लवकरच कळविण्यात येणार आहे.