स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचे एकही कामे व्यवस्थित होत नाही!
कोरची (Clean Survey) : कोरची नगरपंचायतची स्थापना सन 2015 मध्ये झाली. त्याआधी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असतांना, ज्या बऱ्याच नाल्या व रस्ते बांधण्यात आले ते आजही कायम आहेत. नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात कोरची नगरपंचायतची (Korchi Nagar Panchayat) रॅंक 382 आहे. शेवटच्या ठिकाणी कोरची शहर आहे. हे कोरची वासीयांसाठी दुर्दैवी बाब आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारचे एकही कामे व्यवस्थित होत नाही. हेच त्याचे फलित आहे.
निधीचा योग्य वापर केला जात नाही!
सर्वेक्षणामध्ये कचरा व्यवस्थापन (Waste Management) हा महत्त्वाचा मुद्दा असतो. कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एका व्यक्तीला कंत्राट दिला आहे. मासिक 2 लाख रुपये खर्च होत आहेत. स्वच्छतेच्या कामावर जेवढे मजूर असायला पाहिजेत तेवढे नाहीत. कागदोपत्री रेकार्ड मेंटेनन्स केला जातो. जागोजागी कचरा दिसतो. शासनाच्या (Government) कचरा व्यवस्थापन करण्यासाठी जो निधी येतो, त्या निधीचा योग्य वापर केला जात नाही. त्यामुळे ही योजना खराब झाली आहे.
जिथे-तिथे दुर्गंधी पसरते, पाण्याचे नियोजन नाही!
दुसरा मुद्दा आहे लोकसहभागाचा. नगरपंचायत चे पदाधिकारी व सदस्य गावकऱ्यांना आजपावेतो विश्वासात घेऊन कोणतेही काम केले नाही. त्यामुळे लोकांचा सहभाग मिळणार तरी कसे? तिसरा मुद्दा आहे पायाभूत सुविधा. कोरची शहरात सार्वजनिक शौचालय, स्वच्छता गृह नाहीत. त्यामुळे जिथे तिथे दुर्गंधी पसरते. पाण्याचे नियोजन नाही. 20 वर्षापूर्वी पासून जी टाकी आहे, त्याच टाकीतून पाणीपुरवठा होतो. स्वच्छ पिण्यायोग्य पाणी मिळतच नाही. काही वार्डात टॅंकर द्वारे अपूरा पाणी पुरवठा केला जातो. पाण्याविषयी दयनीय अवस्था आहे.
स्वच्छता अभियानाविषयी कोणत्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही!
मागील काही वर्षाआधी नाल्या बांधण्यात आल्या. बांधकाम असे झाले की, चढ कुठे व उतार कुणाकडे राहायला पाहिजे, याचे ना बांधकाम करणाऱ्याला माहीत आहे, ना बांधकाम इंजिनिअरला नी स्थानिक पुढाऱ्यांना. त्यामुळे नालीतील पाणी जिथे तिथे साचून राहते. त्यामुळे डासांची संख्या वाढत जाते व बरेच रोग होत राहतात. स्वच्छता अभियानाविषयी कोणत्याही प्रकारची जनजागृती केली जात नाही. ढेपाळ प्रशासन आणि अधिकारी व पदाधिकारी हेत कोरची च्या प्रगतीला आळा आहेत.
नालीची उपसा केली नाही, रस्तत्यावर कचरा!
2022 पासून नगरपंचायत काॅंग्रेसच्या हातात आहे. काॅंग्रेस पक्षाचे 8 नगरसेवक, भाजपाचे 6, राष्ट्रवादी पक्षाचे 1, अपक्ष 2 असे बलाबल असले, तरी अपक्ष नगरसेवक हीरा राऊत यांना उपाध्यक्ष पद दिल्यामुळे काॅंग्रेसची सत्ता कायम राहिली. त्याआधी 5 वर्षे भाजपाने राज्य केले. त्यावेळी राज्यात भाजपचे सरकार होते, त्यामुळे बराच निधी आणण्यात यश आले. काही का होईना त्यांनी गावभर दिवे लावले. गट नगरपंचायत अंतर्गत पकनाभट्टी येथील वाडॅ कं 1 मध्ये नाली बांधकाम केले, तेव्हापासुन नाली उपसा केली नाही. त्यामुळे नालीतील पाणी घरात घुसतो. नालीची उपसा केली नाही, रस्त्यावर कचरा आहे. तात्काळ नाली उपसुन साफसफाई करावी, अशी मागणी गागसाय सत्तर तोफा वय 45, रूपेश तोफा वय 21, परश तोफा वय 32, प्रताप बालसिंग तोफा वय 38 सर्व रा. पकनाभट्टी येथील गावकरी लोकांनी केली आहे.
पैसा खर्च होत आहे परंतु, विकास होत नाही!
यावेळी काॅंग्रेसचे पाटींची असून, नगरपंचायतचे सर्वेसर्वा आहेत. अवास्तव व अवाजवी भरपूर पैसा खर्च होत आहे परंतु, विकास (Development) होत नाही आहे. लोक दबक्या आवाजात बोलतात की, ते स्वताच्या विकासातच मग्न आहेत. नगरपंचायतच्या सर्वेक्षणात कोरची शहर एवढा खालच्या स्थानी गेला त्याची कारणेही तसेच आहेत.