निवडणुकीपूर्वी आले होते जिल्हाधिकारी गोयल
हिंगोली (Collector Abhinav Goyal) : जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal) यांची बदली झाली असून त्यांना कल्याण डोंबवली महानगर पालिका आयुक्तपदावर पदस्थापना देण्यात आली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी ८ एप्रिल रोजी शासनाने काढले आहे. परंतु त्यांच्या रिक्त जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून गोयल (Collector Abhinav Goyal) यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये पदभार घेतला होता. मागील सात महिन्याच्या कालावधीत त्यांनी प्रशासनात अमुलाग्र बदल केला. महसूल प्रशासनाच्या विविध योजनां सोबतच इतर विभागांच्या योजनांचीही परिणामकारक अंमलबजावणी करण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे सर्व सामान्य नागरीकांमधून समाधान व्यक्त होऊ लागले होते. अतिवृष्टीच्या काळात प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन त्यांनी शेतकरी व नागरीकांशी संवाद साधून त्यांची अडचणी जाणून घेतल्या. या अडचणी सोडविण्यच्या सुचनाही त्यांनी यंत्रणाना दिल्या.
जिल्ह्यात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी त्यांनी निपुण हिंगोली अभियान राबविले आहे. या अभियानात त्यांनी शाळांना भेटी देऊन गुणवत्तेची तपासणी केली. या अभियानात कामचुकारपणा करणाऱ्या दोन शिक्षकांना निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. या अभियानामुळे शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमधून गुणवत्ता वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे. या शिवाय महिलांच्या आरोग्याच्या प्रश्नावर त्यांनी संजीवनी अभियान हाती घेतले. या अभियानात आशा कर्मचाऱ्यांमार्फत जिल्ह्यातील महिलांच्या आरोग्याची माहिती संकलीत करण्यात आली. यामध्ये सुमारे १३ हजार महिला कर्करोग संशयीत असल्याचे दिसून आले असून आता तालुकास्तरावर त्यांची आरोग्य तपासणी – सुरु करण्यात आली आहे.
या तपासणीमध्ये नेमके किती महिलामध्ये कर्करोगाचे निदान – होईल हे स्पष्ट होणार आहे. या शिवाय – नुकत्याच झालेल्या गुंज येथील अपघातग्रस्त – महिलांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी – त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली शिवाय स्वतः भेट देऊन पाहणी केली. पाणी पुरवठा, आरोग्य, शिक्षण या विषयावर त्यांनी जिल्ह्यात यंत्रणांकडून चांगले काम करून घेतले. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अनेक विकास कामांना प्रत्यक्ष भेट देऊन कामाच्या दर्जाची त्यांनी तपासणी केली. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या बदलीचे आदेश आठ एप्रिल ला काढण्यात आले. त्यामुळे चांगल्या कार्यक्षम जिल्हाधिकाऱ्यांची बदली झाल्याने अनेकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. त्यांच्या या बदला जिल्हा वाशीयांमधून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वी जि.प. सीईओ नेहा भोसले यांचीही बदली
सध्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. ज्यामध्ये २५ मार्चला सामान्य प्रशासन विभागाने काढलेल्या आदेशात जि.प. सीईओ नेहा भोसले यांच्या जागेवर अंजली रमेश यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते. १ एप्रिलला अंजली रमेश यांनी जि.प. सीईओ पदाचा पदभार स्विकारला. नेहा भोसले यांचे रायगड जि.प. सीईओ नियुक्ती झाली. आता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांचीही बदली झाल्याने जिल्ह्यातील दोन (Collector Abhinav Goyal) अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत.