‘जय हिंद’ च्या नाऱ्यांनी दुमदुमली चंद्रपूर नगरी
चंद्रपूर (Tiranga Rally) : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी केलेल्या शौर्याला सलाम करण्यासाठी व अतिरेकी हल्यात बलिदान दिलेल्या जवान व नांगरिकांप्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी आज बुधवार दि.२१ मे रोजी सायंकाळी चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्हा काँग्रेस व शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक ते प्रियदर्शनी स्व. इंदिरा गांधी चौक पर्यंत (Tiranga Rally) तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी भर पावसात हजारोंच्या संख्येने उपस्थित नागरिकांनी जय हिंद, भारत मात की जय, जरा याद करो कुर्बानी असे नारे देत रॅलीत सहभाग घेतला आणि भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम केला.
यावेळी भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान व संगणक क्रांतीचे आधुनिक भारताचे भाग्यविधाते माजी पंतप्रधान भारतरत्न स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून भारतीय वीर जवानांच्या शौर्याला सलाम व दहशतवादी हल्ल्यात प्राणाची आहुती देणार्या नागरिकांना सदभावना प्रदान करण्यात आली. यावेळी जय हिंद च्या नार्यांनी चंद्रपूर नगरी दुमदुमल्याचे पहायला मिळाले. (Tiranga Rally) रॅलीची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथून होऊन शहरातील मुख्य मार्गाने प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौक येथे पोहचून येथे विराट सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी देशसेवेत आयुष्य झिझविलेल्या चंद्रपूर जिल्ह्य़ातील माजी सैनिकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. सोबत शहरातील शाळा, महाविद्यालये तथा सर्व धर्मीय देशप्रेमी नागरिक हजर होते.
या (Tiranga Rally) तिरंगा यात्रेमध्ये काँग्रेस पक्षाचे विधीमंडळ गटनेते आ.विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर,आ.अॅड. अभिजित वंजारी, जिल्हा प्रभारी मुजीब पठाण, चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी, माजी जिल्हाध्यक्ष सुभाषसिह गौर, विनायक बांगडे, विनोद दत्तात्रेय, प्रवीण पडवेकर, सुर्यकांत खनके, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,अँड. सतीश वारजुकर, नंदू नागरकर, महिला जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, शहराध्यक्ष चंदाताई वैरागडे, सुनीता लोढ़िया, जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडुर, यासह जिल्हा काँग्रेस, शहर काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक कॉंग्रेस, एनएसयूआय, सेवादल, इंटक, किसान काँग्रेस, काँग्रेसच्या सर्व प्रâंटल आर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यासह हजारोंच्या संख्येने देशप्रेमी नागरिक उपस्थित होते.




 
			 
		

