गंगाखेड अवैध सावकार

परभणीतील गंगाखेड शहरात अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड...?

Gangakhed illegal moneylenders: गंगाखेडमध्ये सहकार विभागाने अवैध सावकाराच्या घरावर काढलेल्या धाडीमुळे धाबे दणाणले गेले. २० मे रोजी सकाळी ८ वाजे नंतर कागदपत्रे जप्त केली गेली

परभणीतील गंगाखेड शहरात अवैध सावकाराच्या घरावर सहकार विभागाची धाड...?

Gangakhed illegal moneylenders

 

अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे धाबे दणाणले..

परभणी (Gangakhed illegal moneylenders) : गंगाखेड शहरातील भाग्य नगर परिसरात सहकार विभागाच्या पथकाने बुधवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास एका खाजगी अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकत अवैध सावकारी व्यवसायासंबंधीचे कागदपत्रे जप्त केली आहे. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

तालुक्यातील कासारवाडी येथील अशोक रोहीदास गुट्टे यांनी गंगाखेड शहरातील भाग्य नगर येथील उत्तम बापुराव गुट्टे व पमनबाई उत्तम गुट्टे हे अवैध सावकारीचा व्यवहार करत असल्याबाबत जिल्हा उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिल्याने या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था परभणी यांचे आदेश जा.क्र. जिउनि/सावकारी/कलम १६ अन्वये धाड/ २०२६/८०८ दि. २७ एप्रिल २०२६ अन्वये सहकारी संस्था परभणी कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी एका पथकाची नियुक्ती केली.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पथक प्रमुख तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तथा सावकारांचे सहाय्यक निबंधक श्रीमती ए. जी. निकम यांच्या नेतृत्वाखाली पथकातील सदस्य, शासकीय पंचासह पोलीस बंदोबस्तात गैरअर्जदारांच्या भाग्य नगर गंगाखेड येथील उत्तम गुट्टे यांच्या राहते घरी बुधवार २० मे रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास धाड टाकून अवैध सावकारी व्यवसायासंबंधी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ नुसार घर झडती घेवुन पंचनामा करत अवैध सावकारीशी संबधीत आक्षेपार्ह दस्ताऐवज जप्त केले. या पथकात सहकार विभागाचे एस. के. पवार, नु.हा. शेख, एम. के. सय्यद यांच्यासह शासकीय पंच म्हणुन स्थापत्य अभियंता एस.बी. मनके, पोलिस कर्मचारी ओमकार गांजरे व श्रीमती गंगासागर एन. पौळ, व्हिडीओ ग्राफर कृष्णा भोसले आदींचा समावेश होता. सहकार विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

शेतकरी व लहान मोठे उद्योगांना विनापरवाना सावकारी करणाऱ्या व्यक्तीकडुन कोणाताही सावकारी (Gangakhed illegal moneylenders) व्यवहार करु नये शेतकरी व लहान मोठे उद्योजक तसेच नागरीकांनी गरज भासल्यास नोंदणीकृत परवानाधारक सावकाराकडुन कर्ज स्वरुपात रक्कमा घ्याव्यात असे आवाहन सहकारी संस्था परभणी कार्यालयाचे जिल्हा उपनिबंधक संजय भालेराव यांनी केले आहे. परवानाधारक सावकाराकडुन शेतकऱ्यांना तारण कर्जावर रु.९ टक्के तर विनातारण कर्जावर रु.१२ टक्के असा व्याजाचा दर असुन शेतकऱ्यांच्या व्यतीरिक्त इतर व्यक्तीसाठी तारण कर्जावर रु.१५ टक्के तर विनातारण कर्जासाठी रु.१८ टक्के असा व्याजाचा दर शासन अधिसुचनेनुसार निश्चित करण्यात आले असल्याचे सांगत अवैध सावकारी करणाऱ्या व्यक्तीस दोष सिध्द झाल्यास ५० हजार रुपये दंड व पाच वर्षाच्या कारावासाची शिक्षा कायदयानुसार निश्चित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

संबंधित सामग्री

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

कळमनुरीत अवैध सावकारी प्रकरणी कारवाई; घरावरील छाप्यात आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

Kalamnuri illegal money-lending case: महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये अवैध सावकारी प्रकरणात कळमनुरी तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sep 29, 2026
महात्मा फुले कर्जमुक्ती योजना; अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर

महात्मा फुले कर्जमुक्ती योजना; अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त कर्जमाफीच्या पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी आज जाहीर

राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी आज (२२ जुलै) अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहे.

Jul 22, 2026
परभणीत दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

परभणीत दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडले; दोघांचा जागीच मृत्यू

Gangakhed Accidental Death: गंगाखेडच्या परळी नाक्यातील चौराह्यात दोन कर्मचार्यांची दुचाकीवरून जाणारा ट्रक अपघात होईल. खड्डामुळे धक्का बसलेला ट्रक धडकून दुचाकीच्या दोन्ही मजकूरांचा मृत्यु

Jul 16, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : लातूर जिल्हा बँकेकडून ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना : लातूर जिल्हा बँकेकडून ४४ हजार ६९९ कर्जखात्यांची माहिती अपलोड

थकीत कर्जदार शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' ही योजना जाहीर केली आहे.

Jul 04, 2026