Maharashtra Farmer Loan Waiver

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! १६.९४ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पीक कर्ज खात्यात ४ ऑगस्टला ७ हजार कोटी जमा होणार

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे.

शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! १६.९४ लाख पात्र लाभार्थ्यांच्या पीक कर्ज खात्यात ४ ऑगस्टला ७ हजार कोटी जमा होणार

Maharashtra Farmer Loan Waiver

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांना डीबीटीद्वारे लाभ; ९४ हजार प्राप्तिकरदाते शेतकरी अपात्र

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घडामोड समोर आली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या पीक कर्ज खात्यात येत्या ४ ऑगस्ट (मंगळवार) रोजी एकाच टप्प्यात सुमारे ७ हजार कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. या प्रक्रियेमुळे १६ लाख ९४ हजार पात्र शेतकऱ्यांना थेट लाभ मिळणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकारच्या या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात सहकार विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने रक्कम जमा केली जाणार आहे. मात्र, यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे. कर्जमाफीची रक्कम पीक कर्ज खात्यात जमा झाल्यानंतर या शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज घेण्याचा मार्गही खुला होणार आहे.

या योजनेनुसार ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. तसेच नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहन निधीची तरतूद करण्यात आली आहे.

याशिवाय, २ लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठीही एकवेळ समझोता (One Time Settlement) योजना लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत संबंधित शेतकऱ्यांनी २ लाख रुपयांवरील उर्वरित थकबाकी बँकेत जमा केल्यानंतर सरकार त्यांच्या कर्ज खात्यात २ लाख रुपये जमा करणार आहे.

योजनेच्या पहिल्या टप्प्यात २ लाख रुपयांच्या मर्यादेतील कर्जदार शेतकऱ्यांची यादी छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडे पाठविण्यात आली होती. या पडताळणीत ९४ हजार शेतकरी अपात्र ठरले असून त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. उर्वरित १६ लाख ९४ हजार पात्र शेतकरी यांची अंतिम यादी निश्चित करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पीक कर्ज खात्यात नियोजित रक्कम जमा केली जाणार आहे.

संबंधित सामग्री

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळा; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, 211 जणांच्या प्रमाणपत्रांत तफावत

जळगाव ZP मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या पुनर्तपासणीत मोठी तफावत; 92 कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात, विभागीय चौकशी सुरू.

Oct 05, 2026
महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

महाराष्ट्रात 3 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोणाची कुठे नियुक्ती?

राज्यात तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; संजय खंदारे वन विभागात, संजय यादव पर्यटन विभागात तर वैष्णवी बी. नागपूरच्या अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्त.

Oct 05, 2026
MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस; राज ठाकरे, मनोज जरांगे आज भेटणार, रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम

पुण्यातील MPSC आंदोलनाचा पाचवा दिवस. राज ठाकरे, मनोज जरांगे पाटील आज भेटणार; रोहित पवारांचा सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम.

Oct 05, 2026
मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AIसह आधुनिक तंत्रज्ञानात वापर वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

मराठीला ज्ञानाची भाषा बनवण्यासाठी AI, डिजिटल माध्यमे, OTT आणि सोशल मीडियातील मराठी कंटेंट वाढवण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 03, 2026
 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद; काय आहे कारण?

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारने अल्पसंख्याक विभागाची ‘वृक्ष लागवड व संगोपन’ योजना बंद करण्याचा निर्णय घेतला.

Oct 02, 2026