जुगार अड्ड्यावर छापा

परभणीत जुगार अड्ड्यावर छापा; २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Illegal gambling raid: गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवार २ जून रोजी सायंकाळी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात

परभणीत जुगार अड्ड्यावर छापा; २३ लाखाचा मुद्देमाल जप्त

Illegal gambling raid

 

एसपींच्या पथकाचे धाडसत्र सुरूच; मैराळ सावंगी शिवारातील कारवाई

परभणी (Illegal gambling raid) : जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने गंगाखेड तालुक्यातील मैराळ सावंगी शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवार २ जून रोजी सायंकाळी धडक कारवाई करत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, दुचाकी व चारचाकी वाहने असा एकूण २३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लिंबाजी वाव्हळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष पथक गस्त घालत असताना गुप्त माहिती मिळाली. मैराळ सावंगी शिवारातील खळी फाटा ते मैराळ सावंगी रस्त्यालगत बाभळीच्या झाडाखाली काही जण ‘झन्ना-मन्ना’ नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. यानंतर पोउपनि संदीप शिंदे, पोउपनि अर्जुन टर्वेâ, इर्शाद सय्यद, वाघमारे, सूर्य ताटीकोंडलवार, गोविंद चुडावकर यांच्यासह पथकाने घटनास्थळी सायंकाळी साडेचारच्या सुमारास छापा टाकला. यावेळी सहा जण पत्त्यांवर पैसे लावून जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी त्यांना जागीच पकडून पंचांसमक्ष झडती घेतली.

या (Illegal gambling raid) कारवाईत आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन तसेच घटनास्थळावर उभ्या असलेल्या पाच दुचाकी आणि दोन कार जप्त करण्यात आल्या. एकूण २३ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी माणिक काशीनाथ जाधव (रा. मैराळ सावंगी), विश्वनाथ किशनराव गायकवाड (रा. दैठणा), सुग्रीव ज्ञानोबा फटांगे (रा. गौंडगाव), नवनाथ तुकाराम जाधव, विठ्ठल सुभाषराव जाधव व अमोल बाबासाहेब जाधव (सर्व रा. मैराळ सावंगी) यांच्याविरुद्ध सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित सामग्री

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

परभणीत जिल्हा स्त्री रुग्णालयात सात महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू

Pregnant woman Death: जिल्हा स्त्री रुग्णालयातील उपचार व रेफरल प्रक्रियेतील कथित हलगर्जीपणामुळे ७ महिन्यांच्या गर्भवती महिलेचा तसेच तिच्या गर्भातील बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना

Aug 09, 2026
परभणीतील मानवतमध्ये साडे चौदा लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

परभणीतील मानवतमध्ये साडे चौदा लाखाचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त

Manwat MD Drug seized: परभणीत रत्नापूर शिवारात १४ लाख ६४ हजार रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा सोमवारी रात्री जप्त झाला. पोलिसांनी दोन संशयित अटक करण्यात आली

Jul 27, 2026
परभणीतील पाथरीत मोकाट कुत्र्याचा पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला

परभणीतील पाथरीत मोकाट कुत्र्याचा पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला

Stray Dogs ​​Attack: पाथरी शहरातील महावितरण उपकेंद्र कर्मचारी वसाहतीजवळ मंगळवारी सकाळी मोकाट कुत्र्याने पाच वर्षीय चिमुकलीवर हल्ला करून तिच्या चेहर्‍यावर व मानेजवळ गंभीर चावा घेतल्याची घटना

Jul 07, 2026
भयानक!...मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार...!

भयानक!...मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने पाच वर्षीय मुलीवर अत्याचार...!

Parbhani Girl Abused: मोबाईल दाखविण्याच्या बहाण्याने घरात बोलवून एका पाच वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना पूर्णा तालुक्यातील एका गावात घडली. सदरचे गाव चुडावा पोलीस ठाणे हद्दित

Jul 06, 2026
परभणीत कर्जाच्या चिंतेत शेतकर्‍याची विषारी द्रव पिऊन आत्महत्या

परभणीत कर्जाच्या चिंतेत शेतकर्‍याची विषारी द्रव पिऊन आत्महत्या

Parbhani Farmer suicides: आर्तिक दबावामुळे लग्नासाठी घेतलेला उधार परतफेड करण्याच्या तणावात शेतकरी विषारी औषध खाऊन आत्महत्याने मृत झाल्यावर पोलिस तपास करीत आहे.

Jun 14, 2026