ट्रॅक्टर अपघाती मृत्यू

पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू; कोरची तालुक्यात हृदयद्रावक घटना

Tractor Accidental Death: कोरची तालुक्यातील कैमूल गावाजवळ पुलावरून ट्रॅक्टर कसल्यानंतर चालक राकेश इंद्रपाल वालदे यांचा जागीच मृत्यू झाला.

पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू; कोरची तालुक्यात हृदयद्रावक घटना

Tractor Accidental Death

 

कोरची तालुक्यात नागरणी पेरणीचे काम जोरात सुरू

कोरची (Tractor Accidental Death) : कोरची मुख्यालय पासुन 13 कि.मी अंतरावर  कैमूल गावाजवळ पुलावरून ट्रॅक्टर कोसळून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृतकाचे नाव राकेश इंद्रपाल वालदे (वय ३० वर्षे )रा. कडीकसा, तालुका. देवरी, जिल्हा. गोंदिया) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर पुलाला धडक देऊन पलटी झाल्याने हा भीषण अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील व ग्रामस्थ तात्काळ घटनास्थळी धावून गेले, मात्र तोपर्यंत चालकाचा जागीच मृत्यू झाला होता.

यानंतर पोलीस पाटील यांनी तातडीने पोलीस स्टेशनला माहिती देत तक्रार दाखल केली तसेच मृतकाच्या वडिलांनाही घटनेची माहिती दिली. (Tractor Accidental Death) अपघातग्रस्त ट्रॅक्टरखाली अडकलेल्या मृतदेहाला बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन बोलावण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी कोरची ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. सायंकाळी उशिरा सुमारे सात वाजेपर्यंत मृतदेह रुग्णालयात पोहोचवण्यात आला असून शवविच्छेदन (PM) करण्यात येणार आहे.

मृतकाच्या वडिलांना दोन मुले असून, शेतीच्या कामासाठी त्यांनी संबंधित ट्रॅक्टर घेतला होता. मात्र, राकेश वालदे यांनी वडिलांना न सांगता कोरची तालुक्यातील कोटरा ग्रामपंचायत अंतर्गत कैमूल परिसरात नांगरणीच्या कामासाठी ट्रॅक्टर नेल्याची माहिती समोर आली आहे. काम आटोपून गावाकडे परत येत असताना पुलाजवळ वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट पुलाखाली कोसळला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, ही (Tractor Accidental Death) घटना समजताच परिसरातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. या दुर्घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पुढील तपास कोरची पोलिस स्टेशनचे पोलीस करीत आहेत.

संबंधित सामग्री

मौशी येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात नांगरणीदरम्यान घडली दुर्घटना

मौशी येथे ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा दुर्दैवी मृत्यू; शेतात नांगरणीदरम्यान घडली दुर्घटना

कुरखेडा तालुक्यातील मौशी येथे शेतात नांगरणी करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १० जुलै) सायंकाळी सुमारे ४ वाजता घडली.

Jul 11, 2026
परभणीत ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून चालकाचा मृत्यू

परभणीत ट्रॅक्टरच्या हेडखाली दबून चालकाचा मृत्यू

Parbhani tractor accident: एक २५ वर्षांवरच्या बळाजी विठ्ठलराव जाधव यांनी शेतकरी कामासाठी ट्रॅक्टर घेऊन वाघपिंपरी शिवारात कॅनॉल किनारी गेला. ट्रॅक्टरचा हेडखाली पलटून त्याचा मृत्यू झाला.

Jun 11, 2026
ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

ट्रॅक्टर कालव्यात कोसळला, १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

वसमत तालुक्यातील अकोली शिवारात ट्रॅक्टर कालव्यात पडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी घडली. ट्रॅक्टरचे हेड अंगावर पडल्याने त्याखाली दबून या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

May 18, 2026
भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

भरधाव ट्रॅक्टरची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू झाल्याने गुन्हा दाखल

Tractor Bike Accident: हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी ते कळमनुरी रस्त्यावर ट्रॅक्टरने दुचाकीला धडक देऊन २१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

Mar 30, 2026
हट्टा येथील युवकाचा ट्रॅक्टर अपघातात  मृत्यू 

हट्टा येथील युवकाचा ट्रॅक्टर अपघातात  मृत्यू 

Youth accidental death: हट्टा: ट्रॅक्टर उलटून त्याच्या डोक्यावरून टायर गेल्याने युवक संकेत पिराजी खिल्लारे याचा मृत्यू झाला.

Mar 29, 2026