जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा पिकविमा कंपनीला दणका!
हिंगोली (Crop Insurance Approved) : कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर सर्कल मधील कोंढूर येथील शेतकर्यांनी पिकविमा अर्ज भरले होते. पर्जन्यमानामुळे त्यांना अपेक्षित उत्पन्न झाले नव्हते. या शेतकर्यांनी इफको टोकीयो कंपनीकडे या शेतकर्यांनी विमा काढलेला असताना, मोजक्या शेतकर्यांना (Farmers) अत्यल्प नुकसान भरपाई देऊन इतर शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले होते. त्यांना 34 शेतकर्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे धाव घेतली असता त्यांना 27 लाख 99 हजार 536 रुपये पिकविमा संरक्षित रक्कम देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने (District Consumer Grievance Redressal Commission) दिले आहे.
34 शेतकर्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे धाव!
सन 2018 मध्ये कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर सर्कल मधील कोंढूर गावातील शेतकर्यांनी पिकविमा अर्ज भरले होते. पावसाचा खंड व अत्यल्प पर्जन्यमान यामुळे शेतकर्यांना अपेक्षीत उत्पन्न झाले नव्हते. शेतकर्यांनी इफको टोकियो कंपनीकडे पिक विमा (Crop Insurance) काढला होता. इफको टोकीयो कंपनीने काही शेतकर्यांना (CLS)CROP LOSS Survey आधारे मोजक्या शेतकर्यांना अत्यल्प नुकसान भरपाई दिली होती. व इतर शेतकर्यांकडे दुर्लक्ष केले. त्या आधारे कोंढूर येथील 34 शेतकर्यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांचेकडे धाव घेतली.
शाररीक व मानसिक त्रासापोटी 5000 रु. व तक्रार खर्च 5000 रु. देण्यात यावे असे आदेशित!
शासनाने 2018 साली कळमनुरी तालुक्यामधे दुष्काळ जाहीर केला होता. आखाडा बाळापूर महसूल मंडळामध्ये 76 दिवसांचा पावसाचा खंड नव्हता असे दर्शविणारा कोणताही पुरावा विरुद्ध पक्ष यांनी दाखल केला नाही व सदर अहवालावर आक्षेप देखील नोंदविण्यात आला नाही. सदर इफको टोकियो कंपनीने पिकविमा रु. 28,00,000 /-(अठ्ठावीस लाख) जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग हिंगोलीच्या कार्यालयात जमा केला आहे. त्यामुळे कोंढूर येथील शेतकर्यांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. आयोगाने शेतकर्यांची बाजू ऐकून घेत सदर 34 शेतकर्यांना पिक विम्याची रक्कम प्रकरण दाखल केल्यापासून 9 टक्के व्याजदराने मंजूर केली. तसेच शाररीक व मानसिक त्रासापोटी 5000 रु. व तक्रार खर्च म्हणून 5000 रु. देण्यात यावे असे आदेशित केले. सदरील 34 शेतकर्यांना 4 वर्षानंतर, न्याय मिळाला असून शेतकर्यांची सक्षम बाजू अॅड. प्रविण विनायकराव जाधव, हिंगोली यांनी मांडली. अॅड. प्रविण विनायकराव जाधव (देशमुख) यांनी मांडली.
अशी आहेत 34 शेतकर्यांची नावे व पिकविमा रक्कम!
पंजाबराव रावसाहेब पतंगे (रु.71555), पुंजाजी रावसाहेब पतंगे (रु.102099), नर्सिंग रावसाहेब पतंगे (रु.62451), नंदकिशोर रावसाहेब पतंगे (रु.56632), शारदाबाई अशोकराव माने (रु.68290), तुकाराम अशोक माने (रु.56632), नारायण पुंजाजी माने (रु.148567), पुंजाजी नारायण माने (रु.56632), पवन पुंजाजी माने (रु.56632), बाबुराव उत्तमराव पतंगे (रु.126580), सुरेखा बाबुराव पतंगे (रु.106062), मिनाबाई उत्तमराव पतंगे (रु.68290), बालासाहेब रामराव पतंगे (रु.165635), गंगाबाई देविदास पतंगे (रु.45757), गजानन बाबुराव पतंगे (रु.100350), अन्नपूर्णा बाबुराव पतंगे (रु.100350), अभिषेक गजानन पतंगे (रु.69165), आदित्य गजानन पतंगे अपाक गजानन बाबुराव पतंगे (रु.69019), केशवराव पंडीतराव पतंगे (रु.50803), कौशल्याबाई बाबुराव चव्हाण (रु.167617), कैलास केशवराव पतंगे (रु.98507), विठ्ठल केशवराव पतंगे (रु.104897), प्रकाश रंगराव पतंगे (रु.109700), कैलास रंगराव पतंगे (रु.51036), विलास रंगराव पतंगे (रु.51036), प्रयागबाई रंगराव पतंगे (रु.102332), बालाराम माधवराव जाधव (रु.68290), उषा बालाराम जाधव (रु.40894), माधव रुस्तुमराव जाधव (रु.112591), अरविंद केशवराव पतंगे (रु.44974), केशव किशनराव पतंगे (रु.84512), माणिकराव तुकाराम पतंगे (रु.73536), अनिता हिराजी पतंगे (रु.54115), संगिता दिपकराव पतंगे (रु.54115) अशा 34 शेतकर्यांना 27 लाख 99 हजार 563 रुपयाचा पिकविमा देण्याचे निर्देश दिले आहेत.