कन्हान (Durga Mandir Donation Box) : कांद्री परिसरातील वार्ड क्रमांक ३ येथील लहान दुर्गा मंदिराची दानपेटी (Durga Mandir Donation Box) अज्ञात चोरट्यांनी फोडु न त्यातील ६३५० रुपयाची रोख रक्कम घेऊन पसार झाल्याने पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
शुक्रवार (दि.१८) जुलै रोजी रामकृष्ण हिरामण बर्वे (६९) रा. कांद्री हे नेहमी प्रमाणे सकाळी ७ वाजता लहान दुर्गा मंदिराकडे गेले. (Durga Mandir Donation Box) मंदीराचे रोडकडील बाजुचे लोखंडी गेट संकलने बांधलेले होते. संकलला लावलेले कुलूप त्यांना दिसले नाही. रामकृष्ण लोखंडी गेट उघडु न मंदीराचे आवारात गेले, त्याना दानपेटी ठेवलेल्या ठिकाणी दिसली नाही. ईकडे – तिकडे ठेवली असेल म्हणुन पाहणी केली तरी दानपेटी दिसुन आली नाही.
मंदीराची दानपेटी कोणीतरी चोरून नेली असावी असा संशय आल्याने रामकृष्ण यांनी लहान भाऊ गोपीचंद कचरू बर्वे यांना (Durga Mandir Donation Box) दानपेटी दिसत नाही. असे सांगितले दोघांनी मंदीराकडे येऊन आजु बाजुला पाहीले असता मंदीरा जवळील चिंचेच्या झाडाखाली नगर पंचायतच्या सिमेंट खुर्चीवर दानपेटी उघडी दिस ली. पेटीत चिल्लर पैसे जसेच्या तसे दिसले.
चार, पाच दिवसापुर्वी पेटी उघडुन चिल्लर पैसे काढुन त्याचे ठोक करून ५०, १०० व ५०० च्या नोटा असे एकुण ६३५० रुपयांची रोख रक्कम ठेवुन कुलुप लावले होते. मंदीरा च्या आवारातील दानपेटी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी लोखंडी गेटचे कुलुप तोडुन आत प्रवेश करुन आवारातुन (Durga Mandir Donation Box) दानपेटी उचलुन चिंचेच्या झाडाखाली नेऊन पेटीचे कुलुप उघडुन त्यातील नगदी नोटा एकुण ६३५० रूप ये चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी रामकृष्ण बर्वे यांचे तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.