परभणीच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 4 लाख 90 हजाराचा मुद्देमाल जप्त!
परभणी (Gambling Den) : शहरातील स्टेशन रोडवर असलेल्या कॉम्प्लेक्स मधील तळघरात काही इसम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन जुगार खेळवित होते. या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने रविवार 10 ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास छापा टाकत 4 लाख 90 हजार 970 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांवर नानलपेठ पोलीस ठाण्यात (Nanalpeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल!
पोनि. विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. राजू मुत्तेपोड, पोलीस अंमलदार मधुकर चट्टे, रणजीत आगळे, निलेश परसोडे, दिपक मुदीराज यांच्या पथकाने कारवाई केली. पोलिसाचे पथक अवैध धंद्यांची (Illegal Business) माहिती काढत गस्त घालत होते. या पथकाला स्टेशन रोडवरील आर.आर. टॉवर जवळ एका दारुच्या दुकानाखाली तळघरात काही इसम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी ऑनलाईन जुगार खेळवित असल्याची माहिती मिळाली. यावरुन पथकाने छापा टाकत जुगाराचे साहित्य, रोख जप्त केली. सदर प्रकरणी सय्यद रियाज, संदीप बोचरे, दिलीप क्षिरसागर यांच्यावर नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.




 
			 
		

