सातवा वर्ग शिकलेल्या भूमीहीन, कर्तबगार महिलेने, पतीच्या निधनानंतर अतिशय खडतर, वसंघर्षमय वाटचालीतून!
बार्शीटाकळी (Hardworking Woman) : भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या संताच्या वचनावर अपार श्रद्धा ठेवत, प्रचंड आत्मविश्वास, अपार कष्ट व विविध संघर्षमयकष्टातून, सातवा वर्ग पास व भूमिहीन महिलेने, पतीच्या निधनानंतर, वारकरी संप्रदायाच्या गुरुपरंपरेतील अभंगात सांगितल्याप्रमाणे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोका, या ध्येयाने वाटचाल करीत, आपला उध्वस्त झालेला दुःखमय संसार, सुखमय करत संघर्षातून चालविलेली वाटचाल अख्या जगाला प्रेरणादायी (Inspirational) ठरेल अशा कर्तृत्ववान महिलेची वाटचाल.
शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आशाबाईच्या जीवनातील संकट काळातील प्रसंग!
बार्शीटाकळी पासून 20 ते22 किलोमीटर अंतरावर तीर्थक्षेत्र आसरा माता अर्थात दोनद फाट्यापासून काही अंतरावर शेलु बुद्रुक हे लहानसे गाव आहे.या पूर्वीपासूनच गावात जयराम काकडहे सात्विक साडेतीन-चार एकर शेती असलेले, शेतकरी कुटुंब वास्तव्यास होते. या गावात चौथ्या वर्गापर्यंत शाळा होती. त्यांना दोन मुले व तीन मुली असा परिवार होता. शेतीत कष्ट करून या व्यक्तीने या 5 मुलांचे चांगल्या पद्धतीने पालन पोषण करून यातील एका मुलाला बांधकाम विभागात नोकरीवर लावले. तसेच पाचही मुलांचे विवाह केले. यातील आशाबाई जयराम काकड यानी सातव्या वर्गापर्यंत शिक्षण घेतले. आशाबाईंचा विवाह हा बाळापुर तालुक्यातील वाडेगाव पातुर रस्त्यावर असलेल्या सांगवी गावातील शिवलाल लांडे यांच्यासोबत झाला. त्यांना संदीप, अमोल व पूजा नामक तीन मुले झालीत. सुखाचा संसार चालू असताना,पतीला आजार जडल्याने त्यांचा जीव वाचावा म्हणून त्यांच्याकडे असलेली शेती विकून त्यांच्यावर उपचार केलेत. परंतु त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्यावेळी मोठा मुलगा संदीप हा पाच वर्षाचा, दुसरा मुलगा अमोल हा तीन वर्षाचा, तर पूजा ही मुलगी एक-दीड वर्षाची असेल.
शेतकऱ्यांच्या शेतातील मिळेल ते काम करत, संसाराला अतिशय खडतर प्रसंगात सुरुवात!
सुखाने संसार चालू असलेल्या आशाबाईचा पती जग सोडून गेला. सासरला तीन लहान मुलासह जीवन जगता येत नसल्याने, आपल्या मुलीला आपल्या गावी आणण्याचा निर्धार, वडिलांनी केल्यानंतर सदर महिला अडीच ते तीन वर्ष आपल्या मुलासह वडिलांच्या परिवारात राहली. यानंतर सदर महिलेला तिच्या वडिलांनी तिला जागा दिल्यानंतर सदर महिलेने एका झोपडीत तीन मुलासह रहावयास आली होती, यावेळी तिच्या वडिलांनी एक पोते ज्वारी दिली होती. यानंतर सदर महिलेने गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील मिळेल ते काम करत आपल्या संसाराला अतिशय खडतर प्रसंगात सुरुवात केली.
आपण कर्म करत राहावा ईश्वर संकटातून मार्ग दाखवितो!
देवावर अतिशय श्रद्धा असलेल्या आशाबाईने, भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, या संत वचनावर विश्वास ठेवत, संकट काळात देवाचे नामस्मरण करत , वेळ आल्यास उपाशी राहणे पसंत करत , मुलांना कष्टाच्या पैशातून सायकल घेतल्यानंतर पिंजर येथील भाऊसाहेब लहाने शाळेत ज्ञानार्जनाचे धडे दिले. संदीप व अमोल हे बारावीपर्यंत शिकलेले असून, परिस्थिती अतिशय नाजूक व कठीण असल्याने संदीपने परिस्थितीचे भान ठेवत शिक्षणातून माघार घेतली, तसेच अमोल ला शिकवावे नोकरीवर लावावे अशा प्रकारचा निर्धार त्यांची आई भाऊ व बहिणीचा असल्यावरही परिस्थिती बिकट असल्याने मुलांना पुढील शिक्षण देता आले नाही. हेच जीवनातील सर्वात जास्त दुःख आहे. एवढी कठीण संकट आल्यावरही आपल्याला जीवनाचा कधी कंटाळा आला का? अशा प्रकारची विचारणा केली असता, माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसते, आपण कर्म करत राहावा ईश्वर संकटातून मार्ग दाखवितो, अशा प्रकारचे मत सुद्धा सदर मुलीने व्यक्त करत शेतकरी आत्महत्या करतात याचे आपणास मनापासून दुःख वाटते. असेही सांगायला आशाबाई विसरल्या नाहीत.
शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून पगार मिळत असल्याने कुटुंबाला मदत!
आशाबाईने कष्टातून जमविलेल्या पैशाची बचत करून घराचे बांधकाम केले, मुलांना शिकविले मुलीचे लग्न केले, काही वर्षांपासून शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेतून पगार मिळत असल्याने कुटुंबाला मदत होत केली तसेच या पैशातून पैशाची बचत केल्यानंतर सवय केल्यानंतर, मुलाकरिताचार चाकी टाटा मालवाहक, दुचाकी घेतल्यानंतर त्यांची परतफेड करणे व कुटुंबाचा खर्च भागविण्यास थोडा हातभार लागत गेला.
गावातील महिलांना संघटित करून गायत्री बचत गटाची स्थापना केली!
यानंतर त्यांनी गावातील महिलांना संघटित करून गायत्री बचत गटाची स्थापना केली. गटातून तीस हजार रुपये खाजगी कर्ज घेऊन गावात किराणा दुकानाची सुरुवात केली. गावातील एका गरजवंत व्यक्तीला मुलीच्या लग्नाकरिता पैसे पाहिजे होते , त्यांनी आपले शेत आशाबाईंना दीड लाख रुपयात विकण्याचा सौदा केला होता. परंतु सदर शेती आशाबाईला मिळू शकली नाही. त्यामुळे आजही सदर कुटुंब भूमिहीन असून काही दिवसांपूर्वीच शासनाच्या घरकुल योजनेतून त्यांना घरकुल मंजूर झाल्याने त्यांचा आनंदात भर पडली आहे. शासनाने गरजवंत व्यक्तीच्या कुटुंबांना आर्थिक निकषाच्या आरक्षणाचा विचार करून कुटुंबातील एखाद्या मुलाला शासकीय नोकरी, किंवा शासनाकडून निराधार कुटुंबांना शेती देतात त्यातील शेती मिळाली तर बरे राहील. असे मत सुद्धा आशाबाईने यावेळी व्यक्त केले.
महिलेचा प्रयत्न हा खरोखरच कौतुकास्पद!
म्हणतात ना मुलगी म्हणजे लहानपणी आई-वडिलांची लेक, भावांची बहीण, सासरची पत्नी व सून, तसेच म्हातारपणात आजी अशा वेगवेगळ्या भूमिका पार पडत असणारी स्त्री असते. परंतु अतिशय विपरीत , कठीण, कुणाचाही आधार नसलेल्या निराधार आशा बाईने माहेरचे व सासरचे नाव उज्वल करून आपला दुःखमय संसार, संकटात ईश्वराचे नामस्मरण करत सुखकर करून संदीप वअमोल या भावंडांनी तिने अपार कष्टातून आपले पालनपोषण करून इथपर्यंत आणले त्यामुळे गेल्या पाच सहा वर्षांपासून आईचे शेतीचे कष्टाचे कामे बंद करणे पसंत परंतु आजही 57 वर्षीयआशाबाई अधून मधून शेतकऱ्यांच्या शेतात कामाला जाण्याचे धाडस करण्याचे प्रयत्न करत असते. अशा या शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या आशाबाईच्या जीवनातील संकट काळातील प्रसंग आठवले तर कोणाच्याही डोळ्यातून अश्रू बाहेर पडतील. शून्यातून विश्व निर्मिती चा झालेला महिलेचा प्रयत्न हा खरोखरच कौतुकास्पद ठरत आहे. पतीच्या निधनानंतर निराधार असलेल्या आशाबाईंच्या संसाराची प्रगतीकडे चालू असलेली वाटचाली निश्चितच अख्या समाजासाठी प्रेरणादायी ठरू शकेल. वाटचाल चा ही बाब अख्ख्या समाजाला प्रेरणादायी ठरत असल्यास नवल का वाटू नये.